Home महाराष्ट्र घुग्घुस येथे शिवजन्मोत्सव सोहळा थाटात संपन्न

घुग्घुस येथे शिवजन्मोत्सव सोहळा थाटात संपन्न

96

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.20फेब्रुवारी):-दि.१९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी जयंती निमित्त सामाजिक संस्था,घुग्घुस द्वारा आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा घुग्घुस थाटात संपन्न झाला. या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती ला घुग्घुस पोलीस निरीक्षक मा.बबन पुसाटे साहेब यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.त्यानंतर युगप्रवर्तक ढोल ताशा पथकच्या गजरात मानवंदना करण्यात आली व परिसरातील सर्व ग्रा.पं. सरपंच व घुग्घुस येथील सर्व राजकीय,सामाजिक नेत्याचा व पत्रकार बंधूचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.किशोरभाऊ जोरगेवार,भाजपा जिल्हाध्यक्ष मा.देवरावजी भोंगळे,भा.ज.यु.मो चे प्रदेश उपाध्यक्ष मा.विवेकजी बोढे,माजी बालकल्याण सभापती सौ.नितुताई चौधरी,माजी उपसभापती निरीक्षण तांड्रा,किसान सेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोशन पचारे,काँग्रेस अनुसूचितजाती जिल्हाध्यक्ष पवन आगदारी,महिला काँग्रेस शहराध्यक्ष सौ.विजयाताई बंडेवार,शिवसेना उपतालुका प्रमुख गणेशजी शेंडे,आप चे शहराध्यक्ष अमितजी बोरकर,AIMIM चे शहराध्यक्ष मा.साजिदजी सिद्धीकि,brsp चे जिल्हामहासचिव मा.सुरेशजी पाईकराव,गुरुदेव सेवा मंडळाचे मधुकर मालेकर,तेली समाजाचे सोनल भरडकर व गावातील खूप मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.

या शिवजन्मोत्सव सोहळाला घुग्घुस पोलीस प्रशासन तर्फे सहकार्य करण्यात आले त्याबद्दल संस्थे तर्फे त्यांचे खूप खूप धन्यवाद या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था,घुग्घुस चे अध्यक्ष इमरान खान,उपाध्यक्ष प्रीतम भोंगळे,सचिव स्वप्नील वाढई,सहसचिव सूचित सोदारी,सल्लागार अधीवक्ता राम मेंढे,कोषाध्यक्ष पंकज धोटे,सदस्य नागेश तुरानकर,पराग आकुलवार,मंगेश हिरादेवे,मोहन जगताप,महेश कैथाल,मयूर कलवल,आकाश चिलका,आशिक शेख,महेश हंसकर,अमन लिपटे,निलेश भोंगळे,निखिल गुरनुले,विवेक ढेमरे व महिला सौ.उज्वला उईके,उषा आगदारि,गीता बोबडे,जनाबाई निमकर,माया मांडवकर,वैशाली देवतळे,सविता गोहणे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here