



🔹मराठी विषयाची कृतीपत्रिका सोडविताना, नीटनेटकेपणा असाव – प्रा. नीता खोत
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
भंडारा(दि.20 फेब्रुवारी):-स्थानिक विद्यार्थी अभ्यास मंडळ तुमसर आणि माझी माय सरसोती भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाइन मार्गदर्शन सत्रात सोमलवार विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नागपूर येथील प्रा. सौं. नीता खोत मॅडम बोलत होत्या.विद्यार्थ्यांनी, मराठी विषयाची कृतीपत्रिका मधील दीर्घोत्तरी कृती सोडविताना प्रस्तावना लिहूनच उत्तराची सुरुवात करावी तसेच स्वमत कृती लिहिताना स्वतःचे मत अंतर्भूत करून सुटसुटीत तीन ते चार परिछेद करून कृती पूर्ण करावी. तसेच मराठी व्याकरण बाबत ‘ सुगम मराठी व्याकरण ‘ हे मो. रा. वाळिंबे यांचे पुस्तक आवर्जून अभ्यासावे कारण पुढे स्पर्धा परीक्षांबाबत खूप महत्त्वाचे ठरते! तसेच कृतीपत्रिका सोडविताना नीटनेटकेपणा आणि स्वच्छ पणा असावा तेव्हाच आपल्याला भरपूर गुण पदरात पडतात! असे मत प्रा. नीता खोत मॅडम यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविकातून प्रा. संजय लेनगुरे यांनी कोरोना काळ आणि बारावी बोर्डाची परीक्षा याबद्दल योग्य ती सतर्कता बाळगुण परीक्षेला सामोरे जावे याबद्दल आपले मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन कुणाल बांडेबुचे यांनी तर आभार गुलशन गौपाले यांनी मानले.कार्यक्रमाला तालुक्यातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कु. रुचिता पारधी, अंजली कनोजे, जानवी ठवकर, प्राची पटले, राजश्री पटले प्रणाली पटले, गुंजन जवळकर, शर्वरी गाळवे, निकिता नागफासे, सोनाली लाडसे शुभांगी किरपाने, शुभांगी पटले,पलक चौरे, निकिता सेलोकर, ऐश्वर्या भाजीपाले, मंथन बडवाईक, युगेश बारागौणे, हर्षल शेंडे, धीरज पडोळे यांनी अथक परिश्रम घेतले.





