



✒️पी.डी.पाटील(धरणगाव प्रतिनिधी)
धरणगाव(दि.20फेब्रुवारी):-तालुक्यातील वंजारी बु येथे दि १८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रसंत रवीदास , छत्रपती शिवराय व राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त व्यख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले .त्या नंतर उपस्थित मान्यवरांचे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री भिकन पाटील सर यांनी केले.
महापुरुषांच्या जयंतीनिमित्त गावातील तरुण पिढीला विचारांचे आदान प्रदान होण्यासाठी ग्रामपंचायत वंजारी बु यांच्या आयोजनातून शुक्रवारी जाहीर व्याख्यान झाले.प्रमुख वक्ते मा सतिश शिंदे सर यांनी छत्रपती शिवराय ते आज ची तरुण पिढी यांच्या विचारांची सांगड घातली. महिला प्रबोधन , बेरोजगार , आम्ही काय शकलं पाहिजे यावर प्रकाश झोत टाकत टाकला.तसेच वक्ते मा मुकेश सावकारे सर यांनी पुरातन काळापासून चालत आलेल्या परंपरा , गाडगेबाबा यांचे विचार आम्ही का आत्मसात करावे यावर माहिती दिली
कार्यक्रमास-गुलाब महाजन , दिलीप साळवे , गरबड आहिरे, गोपाल महाजन, शंकर पाटील, विकास चौधरी, व गावातिल सर्व मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मयूर साळवे तुषार भटकर यांनी प्रयत्न केले.सूत्र संचलन दिपक माळी यांनी केले तर आभार योगेश माळी.





