




🔹छोट्या चिमुकल्यांनी केली पारंपरिक वेशभुषा !
✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
मोर्शी(दि.20फेब्रुवारी):-संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असतांनाच दापोरी येथील जिल्हा परिषद शाळेतील छोट्या मुलांनी पारंपरिक वेशभुषा करून नटून थटून आलेल्या चिमुकल्या मुला मुलींनी “जय शिवाजी जय भवानी” घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला.मोर्शी तालुक्यातील दापोरी येथील लहान मुलांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली या वेळी गावात जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर मुलांनी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त झाडे लावा झाडे जगवा, तुमचे आमचे नाते काय जय जिजाऊ जय शिवराय आशा घोषणा देऊन गावातील सर्व समाजातील जनतेला एक संदेश दिला.
दापोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध उपक्रम राबवून राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा आढावा आपल्या भाषणातुन सादर केला. शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याची माहिती व्हावी म्हणून शाळेच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये शाळेतील मुलींनी आपल्या भाषणामध्ये शिवाजी महाराज हे अठरा पगड जातीचे राजे होते व शिवाजी महाराज याच्या राज्यात मुली महिला सुखरूप होत्या असे आपल्या भाषणात सांगीतले तर काही चिमुकल्यांनी गित साजरे करून राजा कसा असावा तर राजा हा शिवाजि महाराज यांच्या सारखा असावा हेच आपल्या भाषणात मांडले .
यावेळी शिव जयंती उत्सवाला दापोरी येथील सरपंच संगीता ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके, केंद्रप्रमुख गजानन चौधरी, ग्राम पंचायत सदस्य वर्षा फलके, महादेव मसाने, दिनेश श्रीराव, रवींद्र भुक्ते, योगेश अंधारे, पुष्पा आगरकर, माधुरी घोंगडे, संध्या दरोकर, किरण मसाने, निकल श्रीवास, अंकिता विघे, अंकिता नांदूरकर, अंगणवाडी सेविका प्रविना नांदूरकर, वंदना कोल्हेकर यांच्यासह शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वृंद उपस्थित होते.




