Home महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

95

🔸इन्स्पायर अकॅडमी ब्रह्मपुरी चा अभिनव उपक्रम

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.20फेब्रुवारी):-रयतेचे राजे ,हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक ब्रह्मपुरी येथील इन्स्पायर करिअर अकॅडमी येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. नामदेव कावळे हे होते, प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. मोहन कापगते सर, इतिहास विभाग प्रमुख नेवजाबाई हितकरिणी महाविद्यालय ब्रह्मपुरी ,प्रा. संघर्ष पिल्लेवान सर शासकीय तंत्रनिकेतन ब्रह्मपुरी प्रा. पुष्पराज पारधी सर एकलव्य महाविद्यालय नंदुरबार हे उपस्थित होते.

तर प्रमुख अतिथी म्हणून मा. दीपक सेमस्कर सर ,मा.एकता गुप्ता मॅडम ,मनोहर आंबोरकर सर, राहुल जाधव सर मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी ब्रम्हपुरी , विवेक खरवडे सर ,दीपा मेश्राम मॅडम , दीपाली चाचेरे मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते. दिपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इन्स्पायर करिअर अकॅडमी चे संचालक प्राध्यापक लक्ष्मण मेश्राम यांनी केले . प्रास्ताविक भाषणात प्रा लक्ष्मण मेश्राम यांनी इन्स्पायर अकॅडमी चे उद्देश आणि कार्य काय आहेत त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अकॅडमी किती फायद्याची ठरत आहे या बद्दल माहिती दिली. आपल्या प्रमुख मार्गदर्शनात प्रा.डॉ. कापगते सर यांनी शिवचरित्रा बद्दल सविस्तर माहिती सांगून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याला उजाळा दिला त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षेतिल इतिहास विषयाचे महत्व पटवून दिले आणि इतिहासाचा अभ्यास कसा करावा याबद्दल सुद्धा सविस्तर मार्गदर्शन केलं.

त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवना बद्दल माहिती सांगून विद्यार्थ्यांनी त्यांचे विचार आपल्या जीवनात अंगिकारावे असा सल्लाही त्यांनी दिला ,त्याचप्रमाणे प्रा. संघर्ष पिल्लेवान सर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षे बद्दल ची माहिती सांगून स्पर्धेच्या युगात कसे टिकावे यासाठी संयम चिकाटी जिद्द या सूत्रांचा उपयोग करावा असे प्रतिपादन केले त्याचप्रमाणे प्रा. पुष्पराज पारधी सर यांनी स्वतःच्या अनुभवातून स्पर्धा परीक्षेचा खडतर प्रवास कोणत्या पद्धतीने पार करावा या बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले व त्यासाठी विद्यार्थ्यांनी कधीही न थकता सतत अभ्यास करत राहून यश मिळवावे असे प्रतिपादन केले या कार्यक्रमाप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे इन्स्पायर अकॅडमी च्या विद्यार्थ्यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर सुंदर असे विचार प्रकट केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल गडे हिने केले तर आभार प्रदर्शन खेमराज मुंडले यांनी केले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरज मदनकर मयूर चिंचेकर , पल्लवी खेत्रे , श्रेयस मांढरे ,मयुरी सहारे, मनीषा पिल्लेवान तृप्ती नागदेवते, पवन पिसे, सुरज तूरनकर, सन्मुख फुलबांधे, वैभव आत्राम सुहास गजभिये कृणाल हुमणे ,देवानंद ठाकरे इत्यादी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here