




✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी,बीड)मो:;9075913114
सिरसदेवी(दि.20फेब्रुवारी):- गेवराई तालुक्याचे तहसीलदार सचिन खाडे यांच्यावर काल घरात घुसून धमकावल्या प्रकरणी तीन वेगवेगळ्या महिलांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे तहसीलदार सचिन खाडे यांच्यावर वरिष्ठांचे नियत्रंण नाही का? असा प्रश्न छावा क्रांतिवीर सेना चे बीड जिल्हा अध्यक्ष राहुल चाळक यांनी उपस्थित केला आहे.
तहसीलदार सचिन खाडे यांच्या विरोधात अनेक तक्रारी श्रवण बाळ , संजय गांधी योजना या संदर्भात बीड जिल्हा अधिकारी कार्यालयात गेल्या आहेत त्यातच काल गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्हा अधिकारी साहेब तहसीलदार खाडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
खाडे यांनी मागील वर्षात पत्रकार शाम अडागळे यांना माहिती आधीकाराच्या सुनावणी दरम्यान शिवीगाळ करून धक्का बुक्की केली होती या प्रकरणी अडागळे यांनी तहसीलदार खाडे विरोधात गेवराई न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून प्रकरण दाखल केले असताना खाडे यांची सामान्य माणसाला, महिलांना, शेतकऱ्यांना, व पत्रकारांना बोलण्याची वर्तुणूक काही बदलण्याचे नाव घेत नाही. तसेच काही दिवसांपूर्वी शहजाणपूर चकला या गावी अवैध वाळू उपशामुळे चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या संदर्भात काही वाळू माफिया विरोदात सद्यष्य मनुष्य वदाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे परंतु गेवराई तहसीलदार खाडे यांनी वेळेवर कारवाई केली असती तर ही घटना घडली नसती असा प्रश्न मयत कुटंबातील काही व्यक्तीने केला आहे त्यामुळे तहसीलदार खाडे यांच्या विरोधात सुद्धा सदृश्य मनुष्य वदाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्या चार मुलांच्या कुटुंबाची आहे. त्यामुळे तहसीलदार खाडे हे पदाचा गैरवापर करत आहेत का ? असा प्रश्न राहुल चाळक यांनी उपस्थित केला आहे.
तसेच गेवराई तालुक्यातील अनेक राशन दुकानदारांनी लाभार्थ्यांना मोफत चे राशन वाटप केले नाही तरी देखील आजपर्यंत तहसीलदार खाडे यांनी तालुक्यातील कुठल्याही राशन दुकांनदारावर कारवाई केली नाही त्यामुळे खाडे साहेब यांनि काही ठराविक वाळू माफिया, राशन दुकान दार यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी दिली आहे का? असा प्रश्न तालुक्यातील नागरिकांना पडला आहे.
त्यामुळे जिल्हा अधिकारी साहेबांनी तहसीलदार खाडे यांच्या मागील काही वर्षातील कॉल डिटेल्स ची माहिती मागून दोषी आढळल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. अशी मागणी राहुल चाळक यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.




