




✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.19फेब्रुवारी):-सुबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतिने स्वेता लेडीज एम्पोरीम छ.शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.गुणवंत जगतकर यांची उपस्थिती होती.छ.शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला डॉ.गुणवंत जगतकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थितांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी मनोगत व्यक्त करताना दुर्गानंद वाळवंटे म्हणाले,छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये विज्ञान वादाचा पुरस्कार करत अंधश्रद्धेवर ही प्रहार केला आहे त्याकाळी महिलांना सन्मानाने संधी देत सामाजिक प्रश्न प्रश्नाला सुद्धा वाचा फोडली आहे.छ. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या वेळी सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्रित करून मावळ्यांच्या सहकार्याने स्वराज्याची स्थापना केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन लक्ष्मण व्हावळे यांनी केले.
या वेळी कार्यक्रमास डॉ.माधव तांदळे,राजेश वाघमारे,रावसाहेब मस्के,प्रा.भगवान गायकवाड, सचिन गोटमुकले,सिद्धार्थ कांबळे,व्यंकट मुंढे,राहूल साबणे , प्रफुल सावंत,आबासाहेब उपाडे , नवनाथ मस्के यांची उपस्थीती होती. या प्रसंगी व्यापारी यांचीही उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.शेवटी संजय मस्के परिवाराच्या वतीने खिचडी वाटप करण्यात येऊन.उपस्थितांचे संजय मस्के यांनी आभार मानले




