Home महाराष्ट्र वंचित चा अकोला पॅटर्न यवतमाळमध्ये राबविणार -जिल्हा महासचिव डी.के. दामोधर

वंचित चा अकोला पॅटर्न यवतमाळमध्ये राबविणार -जिल्हा महासचिव डी.के. दामोधर

112

✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995465

उमरखेड(दि.19फेब्रुवारी):-तालुकाध्यक्ष संतोष जोगदंडे यांच्या नेतृत्वात तालुका स्तरीय आढावा बैठक व पक्ष प्रवेश सोहळा विश्रामगृह उमरखेड येथे यशस्वीरित्या संपन्न.वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण शोषित, पीडित, वंचित बहुजन वर्गाला सोबत घेत बहुजन समाजाचा दबलेला आवाज बुलंद करन्या करिता समस्त वंचिताचा सत्तेचा मार्ग प्रशस्त करून गेली तीस वर्षापासून अकोला जिल्हा परिषदेवर एक हाती सत्ता स्थापन केली व तमाम वंचितांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.

त्याच धर्तीवर आगामी काळात यवतमाळ जिल्ह्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी संपूर्ण वंचित समाजाला एकत्र करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सत्तेची दारे उघडे करून देणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा महासचिव डी के दामोधर यांनी शासकीय विश्रामगृह उमरखेड येथे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय बैठकीमध्ये विचार व्यक्त केले.

यावेळी जिल्हा महासचिव जोंटी विंनकरे, तालुका अध्यक्ष संतोष जोगदंडे, संभाजी मुनेश्वर, मौलाना सय्यद हुसेन, विनोद बर्डे मौलाना शेख मदार ,धम्मदीप काळबांडे, रवींद्र हापसे ,रवी घुगरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव रेखाताई पाईकराव ,नीताताई मुनेश्वर, नगरसेवक संबोधी, गायकवाड, पंकज गायकवाड, राहुल लोमटे मरीबा गायकवाड, गायकवाड, अथर्वउद्दीन खतीब, गंगाराम दवणे, सुनील मुरमुरे, राजू खंदारे ,मरीबा गायकवाड , भारत पाटील,कदम पाटील तिवरंगकर, अनिल जोगदंडे, अमोल जोगदंडे इत्यादी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.सदर बैठकीमध्ये अनेकांनी पक्ष प्रवेश केला. सदरील कार्यक्रम वंचित बहुजन आघाडी ऊमरखेड तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here