Home महाराष्ट्र मुस्तापूर येथिल शिवजयंती विविध उपक्रमानी साजरी

मुस्तापूर येथिल शिवजयंती विविध उपक्रमानी साजरी

58

✒️नायगाव तालुका प्रतिनिधी(हानमंत चंदनकार)

नायगाव(दि.19फेब्रुवारी):-तालुक्यातील मुस्तापूर येथिल शिवजयंती विविध उपक्रम राबवून साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण करून झाली कार्यक्रमच्या अध्यक्ष शिवाजी सोपान जाधव उपाध्यक्ष अजराबर गंगाधर शिंन्दे बडू उर्फ परमेश्वर प्रकाश जाधव अवधूत मोरे शिवराज शिन्दे,यानी छत्रपती शिवाजीमहाराज याच्या प्रतिमेस पुजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

व्यासपीठावर गावातील मान्यवर सरपंच प्रतिनिधी.माधवराव जाधव पाणीपुरवठा अध्यक्ष अंकुश पा.जाधव सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण चाकूरे से.स.सो.लि.चे चेअरमन अविनाश पाटील आनंदराव जाधव परमेश्वर लोणे तंटामुक्ती अध्यक्ष अशोकराव जाधव दत्ताहारी जाधव चंद्रकांत चाकूरे उपस्थित होते.

माधवराव जाधव यांनी शिवछत्रपती महाराज यांच्या जिवन च्यारित्रावर विचार मांडले तद्नंतर बालकवींनी सुंदर कविता सादर केल्या या कार्यक्रमाच बहारदार संचालन एल पी चाकूरे सर पी एस लोणे सर यांनी केले उपस्थित शिवभक्ताना जयंती मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे आभार प्रा.सुभाषराव जाधव सर यांनी मानले गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…

Previous articleजवाहर विद्यालयात शिवजयंती साजरी
Next articleवंचित चा अकोला पॅटर्न यवतमाळमध्ये राबविणार -जिल्हा महासचिव डी.के. दामोधर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here