



✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.19फेब्रुवारी):-देशातील सर्वाधिक उंचीचा शिवाजी महाराजांच्या पुतळा औरंगाबादच्या क्रांती चौकात बसवण्यात आला आहे. काल रात्री पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आल्यामुळे हा परिसर उजळून निघाला होता.
या सोहळ्यासाठी शहरातील नामांकित 15 ढोल-ताशा पथकांनी एकत्र येऊन महाशिववादनही केलं. शिवरायांचा देशातील सर्वाधिक उंचीचा पुतळा बसवण्यात आल्यानं औरंगाबादकरांमध्येही यावेळी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. या सोहळ्यासाठी औरंगाबादकरांनी क्रांती चौकात एकच गर्दी केली होती. या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे चंद्रकात खैरे, बाळासाहेब थोरात, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.





