Home महाराष्ट्र जवळा (रूमणा) ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचा रासप मध्ये जाहीर प्रवेश

जवळा (रूमणा) ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचा रासप मध्ये जाहीर प्रवेश

72

🔸जवळा (रू.) ग्रामपंचायत इमारत बांधकामाकरिता दिला निधी

✒️जवळा(पुरोगामी न्युज नेटवर्क)

जवळा(दि.19फेब्रुवारी):- दि. १८ फेब्रुवारी २०२२ शुक्रवार रोजी राम सीता सदन संपर्क कार्यालय गंगाखेड येथे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत व विधानसभा अध्यक्ष कृष्णाजी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली गंगाखेड तालुक्यातील जवळा (रूमणा) ग्रामपंचायत सरपंचासह सर्व सदस्यांनी व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी राष्ट्रीय समाज पक्ष व आ.डॉ. रत्नाकर गुट्टे (काका) मित्र मंडळ जाहीर प्रवेश केला.मौजे जवळा (रू.) ता. गंगाखेड येथे ग्राम पंचायत इमारत व्यवस्थित नसल्यामुळे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी आपल्या स्थानिक विकास निधी मधून ग्रामपंचायत इमारत बांधकामाकरिता नीधी दिला.

आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व कृष्णाजी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली जवळा(रूमना) येथील जगन्नाथ चंद्रभान कदम-चेयरमैन, जनाबाई जगन्नाथ कदम-सरपंच, अनिल सोपानराव कदम उपसरपंच, शिवाजी नारायण सूर्यवंशी-सदस्य, भीमराव सखाराम नाईकनवरे-सदस्य, विश्वनाथ गोविंदराव सूर्यवंशी-सदस्य, शेख हसन शेख अमीन साहब-सदस्य सोसाइटी, जगन्नाथ विश्वनाथ सूर्यवंशी-सदस्य, रामभाऊ पंडितराव गायकवाड-बहुजन रयत परिषद जिल्हाध्यक्ष, रोहिदास कोंडीबा कदम, विश्वास पिराजी पकाने -पत्रकार व इंद्रजीत एकनाथ गायकवाड इत्यादि ने राष्ट्रीय समाज पक्ष व आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे (काका) मित्र मंडळात जाहीर प्रवेश केला.या प्रसंगी गुट्टे काका मित्र मंडळाचे तालुका अध्यक्ष शिवाजी पवार यांच्यासह पक्षाचे व गुट्टे काका मित्र मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here