Home महाराष्ट्र सुवर्णमहोत्सवी शाळेत छत्रपती शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा…

सुवर्णमहोत्सवी शाळेत छत्रपती शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा…

98

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.१९ फेब्रुवारी):-२०२२ शनिवार रोजी सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे कुळवाडीभूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम शाळेचे पर्यवेक्षक जे.एस.पवार व सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एन.कोळी यांच्या हस्ते कुळवाडीभूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय व शिवजयंती चे खरे जनक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून शाळेचे उपशिक्षक पी.डी.पाटील यांचा लहान मुलगा संकेत पाटील याने स्वराज्याचे संस्थापक – रयतेचे राजे – छत्रपती शिवरायांच्या जीवनपटावर इंग्रजीतुन प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला.याप्रसंगी शाळेचे उपशिक्षक हेमंत माळी, पी.डी.पाटील, व्ही.टी.माळी, अशोक पाटील शिक्षक बंधू – भगिनी व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here