




✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी,बीड)मो:-9075913114
बीड(दि.18फेब्रुवारी):-कोरोना काळात मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या वारसांना शासनाकडून 50 हजार रुपये सानुग्रह निधी देण्यात येते. त्यासाठी जिल्हा रुग्णालयात तब्बल सव्वा तीन हजार अर्ज दाखल झाले आहेत.बीड जिल्ह्यात दोन हजार 168 जणांचा मृत्यू झाला, मात्र अर्ज सव्वा तीन हजार आल्याने छाननी करताना प्रशासनाची दमछाक होते आहे.
या अर्जात एकही व्यक्ती बोगस नाही मात्र, एकाच कुटुंबातून दोन ते तीन अर्ज दाखल झाल्याने गोंधळ उडालाय.आता या अर्जाची छाननी झाल्यानंतर खऱ्या वारसदारांनाच निधी वाटप करण्यात येईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी सांगितले आहे.




