Home महाराष्ट्र मोर्शी येथे घरकुल, पाणी टंचाई, महाआवास अभियान बैठक संपन्न !

मोर्शी येथे घरकुल, पाणी टंचाई, महाआवास अभियान बैठक संपन्न !

151

🔹तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्या — आमदार देवेंद्र भुयार

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.18फेब्रुवारी):-पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या गावांमध्ये पाणी टंचाई कृती आराखड्यानुसार सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करतांना अपूर्ण पाणीपुरवठा योजना प्राधान्याने पूर्ण करण्यात याव्यात. तसेच मोर्शी तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्या असे निर्देश आमदार देवेंद्र भुयार यांनी दिले. मोर्शी येथील तहसील सभागृहात पाणी टंचाई आराखडा अंमलबजावणी करणे, आवास योजना अंतर्गत येणाऱ्या घरकुल योजनेच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून पात्र लाभार्थ्यांना आपल्या हक्काचा निवारा मिळेल याची दक्षता घ्या. संथगतीने सुरू असलेल्या कामाला वेग द्या असे निर्देश आमदार देवेंद्र भुयार यांनी आढावा बैठकीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणाऱ्या संभाव्य गांवामध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने तात्काळ अंमलबजावणी करण्याची निर्देश देतांना आमदार देवेंद्र भुयार म्हणाले की, नादुरुस्त पाणीपुरवठा योजना प्राधान्याने दुरुस्त कराव्यात. तसेच तालुक्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही यासाठी पाणी पुरवठा विभागाने आपात्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी नियोजन करावे. तसेच नादुरुस्त विहिरींची दुरुस्ती व देखभाल प्राधान्याने पूर्ण करून मोर्शी तालुक्यात पाणी टंचाई आराखड्यानुसार तात्काळ उपाययोजना पूर्ण करण्यात याव्यात. तसेच पिण्याच्या पाण्याच्या टंचाईसंदर्भात प्रस्ताव सादर करून पाणी टंचाई आराखड्याचे नियोजन करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. महाविकास अभियान अंतर्गत होणारे फायदे प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचवून त्या योजना शेवटच्या घटकपर्यंत पोहचवून एकही लाभार्थी वंचित राहता कामा नये अश्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

यावेळी बैठकीला आमदार देवेंद्र भुयार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, पंचायत समिती सभापती विना बोबडे, जिल्हा परिषद सदस्य संजय घुलक्षे, गट विकास अधिकारी रवींद्र पवार, नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकरे, महावितरण कार्यकारी अभियंता मळसने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, पाणी पुरवठा अभियंता चिंच मालातपुरे, पंचायत समिती सदस्य यादवराव चोपडे, भाऊराव छापाणे, रुपाली पुंड, कळसकर, माया वानखडे, खातदेव, मोर्शी तालुक्यातील सर्व सरपंच, सचिव, पंचायत समिती सर्व विभागाचे अधिकारी व गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here