Home गडचिरोली शास. औ. प्र. संस्थेत शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा संपन्न

शास. औ. प्र. संस्थेत शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा संपन्न

80

🔸प्रशिक्षणार्थानी व्यवसाय कौशल्य ‌विकसित केली पाहिजेत- प्राचार्य संतोष साळुंके

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.18फेब्रुवारी):-जिल्ह्यातील सर्व माजी प्रशिक्षणार्थ्यांसाठी शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत टिसीपिसी विभाग आणि अलाईड रिसोर्स मॅनेजमेंट सर्विसेस च्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंके होते तर मेळाव्याचे मार्गदर्शक म्हणून अलाइड रिसोर्स मॅनेजमेंट सर्विसेस पुणे चे प्रतिनिधी सुनील अहिरे आणि विश्वनाथ पाटोळे लाभले होते. मेळाव्याचे प्रास्ताविक टीसीपिसी विभागाचे प्रमुख आनंद मधुपवार यांनी केले. मेळाव्याच्या संबंधित माहिती बंडोपंत बोढेकर यांनी दिली तर विविध कंपन्यांची विस्तृत माहिती सुनील अहिरे यांनी दिली. याप्रसंगी प्राचार्य साळुंके म्हणाले, संस्थेतील प्रशिक्षणानंतर प्रशिक्षणार्थांनी व्यवसाय कौशल्य प्राप्त करण्यासाठी शिकाऊ उमेदवारीचे प्रशिक्षण घेतले पाहिजेत ,त्यातून व्यवसायाचे विविधांगी ज्ञान प्राप्त होत असते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर मेश्राम यांनी केले . मेळाव्याचे यशस्वीतेसाठी निदेशक पुरम,बारसींगे, गोडघाटे आदींनी सहकार्य केले. १०९ उमेदवारांच्या मुलाखतीतून निवड झालेल्या २३ उमेदवारांना आफर लेटर देण्यात आले. येत्या तीन दिवसांत हे उमेदवार संबंधित कंपनीत रूजू होणार आहे.निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीच्या पे रोलवर घेण्यात येणार असून शासकीय योजना अंतर्गत एनएपीएस अंतर्गत लाभ मिळणार आहे. वेराक इंजीनियरिंग कंपनी चाकण ,टकवे, रांजणगाव तसेच महिंद्रा अँड महिंद्रा चाकण , ब्रिटानिया इंडस्ट्रीज रांजणगाव ,एल अँड टी तलेगाव आदी पूणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या कंपन्यांसाठी ही भरती करण्यात आली. निवड झालेल्या उमेदवारांच्या सोयीसाठी गडचिरोली पासून पुणे येथे जाण्यासाठी कंपनीतर्फे ट्रॅव्हल ची व्यवस्था करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here