Home चंद्रपूर लावण्या न्याय मिळवून देण्यासाठी आणि अभाविप कार्यकर्त्यांना सोडण्याच्या मागणीला घेऊन अभाविप चंद्रपूर...

लावण्या न्याय मिळवून देण्यासाठी आणि अभाविप कार्यकर्त्यांना सोडण्याच्या मागणीला घेऊन अभाविप चंद्रपूर जिल्हा तर्फे धरणे आंदोलन

84

🔹अभाविप चे जिल्हा अधिकाऱ्यामार्फत तामिळनाडूच्या राज्यपालांना निवेदन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.18फेब्रुवारी):- सेक्रेड हार्ट्स हायस्कूल, तंजावूर, तामिळनाडूची विद्यार्थिनी एम लावण्य हिच्या आत्महत्येने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि आपल्या देशातील संपूर्ण तरुणांना खूप मोठा धक्का बसला आहे. हे आपल्याला वेदना देते की लावण्यला ख्रिश्चन धर्मात सक्तीने धर्मांतर करण्याच्या प्रयत्नामुळे झालेल्या भीषणतेमुळे तिला तिचे जीवन संपवावे लागले, ज्यांची तिने जाणीवपूर्वक रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओ क्लिप मध्ये साक्ष दिली आहे.

14 फेब्रुवारी 2022 ला लावण्यला न्याय देण्याची मागणी करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या घराबाहेर निदर्शने करत असताना. तामिळनाडू पोलिसांनी ABVP च्या राष्ट्रीय महामंत्री श्रीमती निधी त्रिपाठी, राष्ट्रीय मंत्री मुथुरामलिंगम, दक्षिण तामिळनाडू प्रांताच्या मंत्री सुशीला आणि इतर कार्यकर्त्यांना अटक केली. टी.एम.के सरकार लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारच्या सूडबुद्धीने सर्व कार्यकर्त्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.लावण्य आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी व अटक करण्यात आलेल्या अभाविप कार्यकर्त्यांची तात्काळ सुटका करावी, अशी मागणी भारतीय विद्यार्थी परिषद जिल्हा चंद्रपूरच्या वतीने करण्यात आली. या वेळी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आले व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अभाविपच्या शिष्टमंडळाने तामिळनाडूच्या राज्यपालांना निवेदन पाठविण्यात आले.

यावेळी चंद्रपूर जिल्हा संयोजक प्रविण गिलबिले, सहसंयोजक आशुतोष द्विवेदी,जिल्हा आयाम प्रमुख शैलेश दिंडेवार, भाग संयोजक जयेश भडघरे,अमोल मदने, गणेश नक्षीने,शकिल शेख, नगर सहमंत्री वैदेही मुडपलीवार, छकुली पोटे, यश चौधरी, हर्षल निवलकर, अंजली सिंह बैस, भाग्यश्री नागपुरे, प्रियांका चिताळे,छकुली बावणे, राधिका गौरकर, निवेदिता मुजुमदार,कमलेश सहरे,पियूष बनकर,तन्मय बनकर,भूषण डफ, अमित पटले, व अन्य मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here