



✒️रोशन मदनकर(उप संपादक)
नागभीड(दि.18फेब्रुवारी):-राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत व जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत समुपदेशन जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्यातर्फे नेवजाबाई हितकारीणी विद्यालय नवेगाव पांडव येथे व्यक्तिमत्व विकास व शालेय समुपदेशन कार्यक्रम दिनांक 18.02.2022 रोज शुक्रवारला घेण्यात आला.या मानसिक आरोग्य कार्यक्रमासाठी मानसोपचार तज्ञ डॉक्टर शशिकांत बांबोळे साहेब हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मानसिक आजार व लक्षणे यावर उपचार, तसेच व्यक्तिमत्व विकास करीत असताना तार्किक विचार, कृतिशील विचार, सत्यावर आधारित विचार करणे गरजेचे आहे असे सांगितले.
स्वतःला पॉझिटिव्ह फीडबॅक देण्याची सवय प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात लावून घ्यावी. त्यामुळे ती सवय दीर्घकाळासाठी फायद्याचे ठरते,असे सांगत अनुकरणही तार्किक आधारावर असले पाहिजे असे मत व्यक्त केले. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे मानसिक आरोग्याबाबत एक टीम काम करते त्याद्वारे मानसिक आरोग्याबाबत उपचार, समुपदेशन यांसारख्या सुविधा विनामूल्य मोफत सर्व जनतेकरिता उपलब्ध आहेत याबद्दलची माहिती दिली.
या कार्यक्रमाचे निमित्ताने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत विद्यालयाचे शिक्षक श्री सतीश डांगे सर व ललित महाजन सर यांनी केले. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विद्यालयाचे शिक्षक श्री नरेंद्र चुऱ्हे सर यांनी केले.या कार्यक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक मुनीराज कुथे सर ,मनोज हेमके सर, वेदप्रकाश बेदरे सर व शिक्षकेतर कर्मचारी इ.जे फुकट यांनी सहकार्य केले.


