Home महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीचा दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न

वंचित बहुजन आघाडीचा दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न

383

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.17फेब्रुवारी):-जिल्ह्यात आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी ने राज्यात घालून दिलेला अकोला पॅटर्न यवतमाळ जिल्ह्यात यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून वंचित बहुजन आघाडी पुसद तालुक्याच्या वतीने संभाजीनगर येथे दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले .

या शिबिरास श्रद्धेय नेते ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू आणि निष्ठावंत असलेले प्रशिक्षक माननीय भास्कर भोजने सर व सिद्धार्थ देवदरीकर सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व वंचित बहुजन आघाडी यवतमाळ पश्चिम चे जिल्हाध्यक्ष धनंजय गायकवाड जिल्हा महासचिव डी.के.दामोधर, बुद्धरत्न भालेराव तालुकाध्यक्ष पुसद यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाले.

दोन दिवसीय प्रशिक्षणामध्ये उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना वंचित बहुजन आघाडी तथा श्रद्धेय नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी तळागळातील शोषित पीडित वंचितांना सोबत घेऊन गेली तीस वर्षापासून अकोला जिल्ह्यांमध्ये अकोला पॅटर्न यशस्वी करून समस्त बहुजनांना सत्तेची फळे चाखण्यासाठी मार्ग प्रशस्त करून दिला याचीच पुनरावृत्ती करण्याच्या दृष्टिकोनातून यवतमाळ जिल्ह्यामध्ये अकोला पॅटर्न यशस्वी व्हावा अशा महत्त्वाच्या गोष्टी प्रशिक्षक भास्करभोजने सर व देवदरीकर सर यांनी सांगितल्या.

या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश खिल्लारे, माधवराव मनवर ,रवी चौरे ,मिलिंद पठाडे ,भारत मार्कड प्रसाद खंदारे विशाल डाके साधम्म जाधव ,पद्मा दिवेकर किशोर कांबळे ,प्रशांत सरोदे नितीन सरोदे, राहुल जोगदंडे, गौतम वावळे,सिद्धार्थ बर्डे ,राहुल गायकवाड, कृष्णा दांडेकर,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here