Home चंद्रपूर CTPS परिसरात वाघाच्या हल्ल्यात मजुराला ठार

CTPS परिसरात वाघाच्या हल्ल्यात मजुराला ठार

68

🔹CTPS व वन विभागाचा गलथान कारभार

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.17फेब्रुवारी):- देश्याच्या दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या विज निर्मिती केंद्रात काल रात्री १०.३० वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघाने कामावरून परत घराकडे जात असलेल्या एका मजुरांवर हल्ला करून ठार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

भोजराज मेश्राम वय ५९असे ते वैद्यनगर तुकुम येथील घटना आहे.सिटीपीएस मधील कुणाल कंपनीत काम करीत होते.युनिट क्र ८व ९ मधील बेल्टचा काम करीत असल्याची माहिती आहे.काल रात्री आपले काम करून घराकडे जात असतांना आत मधील रस्त्यावरच दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला असुन अजूनपर्यंत त्यांचे शव मिळालेले नाही.

सिटीपीएसचा गलथान कारभार

सिटीपीएसमध्ये आतमध्ये जाण्यासाठी कुणालाही परवानगी नाही.आत मध्ये जाण्यासाठी सिआयएसएफची मंजूरी घ्यावे लागते मात्र सिटीपीएसचे अधिकारी आमदार व इतर राजकारण्यांना आत जाण्यासाठी राजरोसपणे सुट दिल्या जाते.वाघांचे आत मध्ये अनेकदा वावर असल्याचे दिसून आले आहे.मात्र वनविभाग व सिटीपिएसचे अधिकारी मुग गिळून गप्प बसले आहेत.सिटीपीएस मध्ये इतक्या घटना घडत असताना सुध्दा अधिकारी झोपेचे सोंग घेऊन 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here