Home पुणे व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सुप्रसिद्ध पार्श्व गायिका मोना भोरे यांचे महेकी...

व्हॅलेंटाईन डे च्या पार्श्वभूमीवर पुण्यातील सुप्रसिद्ध पार्श्व गायिका मोना भोरे यांचे महेकी महेकी सांसे हे नवीन गीत प्रदर्शित

95

🔸नागेश झळकी मैत्री प्रस्तुत तुम्हारी याद मे मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रमात महेकी महेकी सासे गीताचे लॉन्चिंग

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.17फेब्रुवारी):–पुण्यातील संगीतप्रेमींसाठी सातारा रस्त्यावरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह येथे व्हॅलेंटाईन डे च्या पूर्वसंध्येला १३ फेब्रुवारी 2022 रोजी नागेश झळकी व मैत्री प्रस्तुत तुम्हारी याद मे मराठी हिंदी गीतांचा कार्यक्रम झाला. यात विविध गायकांनी मिळून २९ गाणी सादर केली. यात गानकोकिळा स्वर्गीय लता दीदींना श्रद्धांजली देण्यात आली.पुण्यातील सुप्रसिद्ध पार्श्वगायिका मोना भोरे यांचे महेकी महेकी सांसे हे नवीन गाणे प्रसिद्ध उद्योगपती व संगीतप्रेमी झोहेर चुनावाला यांचे हस्ते प्रदर्शित करण्यांत आले व श्रोत्यांसाठी उपलब्ध करण्यापूर्वी लतादीदींना समर्पित करण्यात आले.

कार्यक्रमाचे तांत्रिक नियोजन, ध्वनी, विडिओ हे विक्रम क्रिएशन्सचे विक्रम अंबिके यांचे होते व ते त्यांनी उत्कृष्ठ रित्या सांभाळले. कार्यक्रमाचा दर्जा व उत्कृष्ट सादरीकरण व आवाज ह्या जमेच्या बाजू ठरल्या. मोना भोरे यांचे सोबतच संगीता ताटुगडे, रमा काजरेकर, सौजन्या गिरी, डॉ मिलिंद पटवर्धन, राजू मोडगी, डॉ संजीव तांदळे, राजेंद्र ललगुनकर, शिरीष डबीर,श्याम भोरे ,सुबंतो धर या गायकांनी बहारदार गीते सादर केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश सोळंकी यांनी केले.

मेहकी मेहकी सांसे हे गीत गीतकार श्याम भोरे यांनी लिहिले असून नामवंत संगीतकार दत्ता थिटे यांनी संगीतबद्ध केले आहे. पहिल्या भेटीनंतरची पहिल्या प्रेमाची मनाची अवस्था गीतकाराने उत्कृष्ट शब्दात मांडली असून त्याला साजेसे नाविन्यपूर्ण संगीत व गायिका मोना भोरे यांचे सुरेल भावप्रधान रेशमी आवाज ह्या या गाण्यातील जमेच्या बाजू आहेत. मोना भोरे व श्याम भोरे यांचे या पूर्वी टी सिरीज चा जय आंबे माँ हा भक्तिगीतांचा अल्बम, तसेच बॅलन्स या सिनेमातून पार्श्वगायन, फेसबुक व यू ट्युबच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम प्रसिद्ध झाले आहेत. भक्तिरचना, हिंदी मराठी भावगीत व सिने गीत, लग्न कार्याकरिता सादरीकरण, स्टेजशोज अश्या अनेक माध्यमातून सतत मोना भोरे यांचा एक चाहता वर्ग तयार झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here