




✒️सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466
उमरखेड(दि.17फेब्रुवारी):-ज्या प्रमाणे बैलगाडीचा पाठलाग त्या बैलगाडीची चाके करतात त्याच पद्धतीने माणसाचे वाईट विकार हे माणसाच्या आयुष्यात त्याचा पाठलाग करतात आणि आयुष्य दुःखमय करून टाकतात विपश्यना करून ध्यान साधनेद्वारे स्वतःला तपासता येते स्वतःला सुखी करता येते म्हणून विपश्यना हाच जीवन जगण्याचा समृद्ध मार्ग असल्याचे प्रतिपादन मुंबई येथील भदन्त बोधीशील यांनी केले आहे.ते मुळावा येथे आयोजित “अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदे” च्या सायंकाळच्या सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
यावेळी डॉ. खेमधम्मो महाथेरो, डॉ .सत्यपाल महाथेरो औरंगाबाद , भदन्त दयानंद महाथेर, भदन्त नागसेन, नागपूर आर्याजी सत्यरक्षिता सह भिक्षु आणि भिक्षुणी संघ उपस्थित होता.आपल्या सखोल अशा धम्मदेशना नेत भदंत बोधीशील यांनी ‘विपश्यना हाच जीवन जगण्याचा मार्ग आहे’.या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले.
अनेक आजार आपल्या मनात निर्माण होतात या मानसिक आजारातून भगवान बुद्धाचे धम्माचे आचरण आपल्याला वाचू शकते बुद्धधम्म हा अनुभूती च्या स्तरावर तपासता येतो त्यासाठी विपश्यना आवश्यक आहे कारण मनाचा विकार दूर करने स्वतःच्या चित्ताला तपासून पाहणे हेच बुद्धाचे अनुशासन आहे असेही ते म्हणाले.त्यानंतर भदन्त दयानंद महाथेरो यांनी पंचशील चे महत्व सांगून माणसाला सर्वांग सुंदर करण्याचा मार्ग हा पंचशील असल्याचे प्रतिपादन करून त्यावर सविस्तर विवेचन केले.
भिक्षुणी सत्यरक्षिता यांनी बौद्ध धम्मातील महिलांचे स्थान व त्यांनी केलेले कार्य या विषयावर सुंदर असे विवेचन केले गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या आदर्श बौद्ध धर्म परिषदेमध्ये केवळ संघाद्वारे बौद्ध धम्मातील वेगवेगळ्या विनया वर, सिद्धांतावर धम्मदेशनेतून मानव दुःख मुक्तीचा मार्ग सांगण्यात येतो.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . डॉ . खेमधम्मो महाथेरो यांनी वेगवेगळे धम्मातील सिंद्धात सांगुन सुत्रसंचालन केले.तर या धम्म परिषदेचे आयोजन अखिल भारतीय बौद्धज्ञानालंकार शिक्षण संस्था मुळावा चेअध्यक्ष भदन्त धम्मसेवक महाथेरो यांच्या मार्ग दर्शनात केले.




