



✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)मो:-९४०४०७१८८
चामोर्शी(दि.16फेब्रुवारी):- तालुक्यातील मारकंडा कंनसोबा-घोट मार्गावरील गुंडापल्ली-मारकंडा कंनसोबा मार्ग पूर्णत: उखडला आहे. जागोजागी खड्डे पडल्याने येथून ये जा करताना वाहनधारकांना मनस्ताप सहन कराव लागत आहे. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी सातत्याने नागरिकांकडून केली जात असताना याकडे प्रशासनाद्वारे दुर्लक्ष होत आहे.
मारकंडा कंनसोबा -घोट मार्ग हा गडचिरोली,चामोर्शी,रेगडी, व मुलचेरा,चामोर्शी, या दोन्ही तालुक्यातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी सोयीस्कर आहे. परिणामी या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडले असल्यामुळे नागरिकांना मणक्यांचे आजार बळावले आहेत. शिवाय या मार्गावर अनेकदा अपघातही घडून आले आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनीही याकडे लक्ष घालून रस्त्याची दुरुस्तीसाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे.


