Home महाराष्ट्र आ. रमेश लटके निष्क्रिय म्हणजे निष्क्रिय व्यक्तिमत्व, राजीनामा द्यावा – पँथर डॉ....

आ. रमेश लटके निष्क्रिय म्हणजे निष्क्रिय व्यक्तिमत्व, राजीनामा द्यावा – पँथर डॉ. राजन माकणीकर

69

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.15फेब्रुवारी):- १६६ अंधेरी विधानसभा मतदारसंघाचे सेना आमदार रमेश लटके निष्क्रिय व्यक्तिमत्व असून कोणताच विकास ना केल्याने त्यांनी नैतिकता समजून स्वतः पदाचा राजीनामा द्यावा असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केले

डॉ. माकणीकर म्हणाले के, ओमकार दर्शन गुंदवली एस आर ए सहकारी रहिवाशी गृहनिर्माण संस्था मर्यादित सिटीएस क्रमांक ८६, ८६/१ ते ७६, २०७ अ(भाग) २०७ ए/५ ते ३० गुंदवली गावठाण आझाद रोड, अंधेरी पूर्व येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजने अंतर्गत प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाचे विकासक उन्मेश दिवाकर रावते शिवसेना नेते व आमदार पुत्र आहेत, सृजन डेव्हलपर कन्स्ट्रक्शन डिविजन आणि सहविकासक म्हणून पंकज धूत शिवशिवम डेव्हलपर प्रा.लि हे काम करत आहेत.

प्रकल्पात भोंगळ कारभार असून भ्रष्टाचार झाला असल्याच्या तक्रारी प्रकल्पग्रस्त करत आहेत.एस आर ये प्रशासन व स्थानिक आमदार मात्र मूग गिळून गप्प आहेत. कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघा चे आमदार अतुल भातखळकर यांनी जनतेच्या तक्रारीहून विकासाकावर कारवायी करण्याची मागणी केली मात्र स्थानिक निगरगट्ट आमदार रमेश लटके यांनी कोणतेच ठोस पाऊल आजपर्यंत उचलले नाही.म्हणजे डाळ मे कुछ काला ना होकर पुरी डाल ही काली होणे के आशंका डॉ. राजन माकणीकर व्यक्त केली आहे.

निवडून आल्यापासून आ. रमेश लटके यांनी कोणतीच विकासकामे केली नसून मतदारसंघात त्यांच्या बद्दल कमालीचा असंतोष आहे,निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना परत बोलाविण्याचा अधिकार जर मतदारांना दिला असता तर अशी व्यक्ती आमदार राहिलीच नसती, मात्र: आमदार रमेश लटके यांनी नैतिकता समजून राजीनामा द्यावा असा मनोदय ही पँथर डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here