



✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि.15 फेब्रुवारी):-आज मंगळवारला सकाळी ठीक 11 वाजता श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम भगवती देवी विद्यालय, देवसरी ता. उमरखेड येथे विद्यालयाच्या भव्य निसर्गरम्य अशोक वृक्षाच्या छायेखाली बंजारा समाजाचे आराध्य दैवत, थोर समाजसुधारक, जगद्गुरू संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
संत श्री सेवालाल महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित माहिती शाळेचे मुख्याध्यापक प्रल्हाद देवबाराव मिरासे यांनी सविस्तर माहिती सांगितली याप्रसंगी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक दिनेश भाऊ वांन्नरे, दिगंबर माने, गणेशराव शिंदे, भागवतराव जाधव, अरविंद अन्ना चेपुरवार व विद्यार्थी या कार्यक्रमास उपस्थिती होते.
कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.


