



✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.15फेब्रुवारी):-संयुक्त महाराष्ट्राचे पाहिले मुख्यमंत्री स्व. बाळासाहेब गंगाधर खेर आणि माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सर यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारतात विविध राज्यांमध्ये हे ह्या संस्थेमार्फत विविध कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे सुरू आहे. खेरवाडी सोसियल वेलफेअर असोसिएशन, मुंबई द्वारा संचालित ब्रम्हपुरी येथे युवापरिवर्तन संस्थे मार्फत तालुक्यातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मागील काही वर्षांपासून विविध प्रकारचे कौशल्य विकास प्रशिक्षण अगदी माफक दरात उपलब्ध करून, त्यांना योग्य रित्या प्रशिक्षण देणे सुरू आहे. अशातच, आज ब्रम्हपुरी येथील युवा परिवर्तन संस्थेच्या प्रशिक्षण केंद्रात दि.15 फेब्रुवारी 2022 रोजी मंगळवारला युवा परिवर्तन संस्थेचा 24 वा वर्धापन मोठ्या उत्साहात साजरा करतात आला.
सदर कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपण करून करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून ऍड.आशिष गोंडाने सर, श्री.रवींद्र गाठे सर, श्री. आशिष ठेंगरी सर, श्री.उदयकुमार पगाडे सर, श्री.सचिन दिघोरे सर आणि युवापरिवर्तन संस्थेचे सर्व कर्मचारी व प्रशिक्षणार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.नाविन्यपूर्ण काही निवडक विद्यार्थ्यांना आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.


