




✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)
घुग्घूस(दि.15फेब्रुवारी):- येथील आ. किशोरभाऊ जोरगेवार यांच्या यंग चांदा ब्रिगेड सामाजिक संस्थे तर्फे वार्ड क्र. 6, तुकडोजी नगर मधे सिमेंट कांक्रीटच्या रस्त्याची मागणी करण्यात आली. तुकडोजी नगर येथील सविता विनोद भोस्कर यांच्या घरापासून सचिन विनायक बक्षी यांच्या घरामार्गे शंकर रणदिवे यांच्या घरापर्यंत सिमेंट कांक्रीटचा रस्ता बनवून द्यावे, असे निवेदन आज घुग्घूस नगरपरिषद च्या मुख्याधिकारी मा. अर्शिया जुही मँडम यांना देण्यात आले.
यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी महिला आघाडी शहर अध्यक्ष सौ. उज्वलाताई उईके आणि बहूजन महिला आघाडी शहर अध्यक्ष सौ. उषाताई आगदारी यांनी मुख्याधिकारी मँडम यांना निवेदन दिल्यानंतर लवकरात लवकर वार्डातील लोकांना सिमेंट कांक्रीटचा मजबूत रस्ता बनवून द्यावे, अशी विनंती केली. यावेळी वार्ड क्र. 6 येथील सौ. अर्चनाताई उईके, सौ. प्रतिभाताई उईके, सौ. रुपालीताई नेवारे, संजयजी जाधव, निकेश्वरजी नेवारे आदी उपस्थित होते.*




