



✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
कोल्हापूर(दि.15फेब्रुवारी):-निर्मिती विचारमंच, सत्यशोधक इतिहास परिषद, गरुडभरारी एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन आणि धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त… छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी… दि. 18 ते 20 फेब्रुवारी, 2022 रोज सायं. 5:30 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे तीन दिवसीय जाहीर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.दि. 18 फेब्रुवारी, 2022 सायं. 5:30 वा. व्याख्यानमालेचे उदघाटन ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. प्रकाश मोरे यांच्या हस्ते होणार असून छत्रपती शिवाजी महाराज आणि बहुजन समाज या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. किसनराव कुराडे हे आपले विचार मांडणार आहेत.
यावेळी अध्यक्ष म्हणून साहित्यिक आणि शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास सुतार तर सन्माननीय उपस्थिती ज्येष्ठ सेक्युलर नेते ॲड. मंचकराव डोणे उपस्थित राहणार आहेत.दि. 19 फेब्रुवारी, 2022 सायं. 5:30 वा. छत्रपती शिवाजी महाराज आणि जातीअंत याविषयावर ज्येष्ठ सामाजिक विचारवंत प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे प्रमुख वक्ते म्हणून मांडणी करणार आहेत तर अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते बसवंताप्पा उबाळे, सन्माननीय उपस्थिती म्हणून बहुजन रयत परिषदचे नेते अब्राहमबापू आवळे उपस्थित राहणार आहेत.दि. 20 फेब्रुवारी, 2022 सायं. 5:30 वा. कोल्हापूर आणि शिवप्रेमी या विषयावर इतिहास संशोधक, लेखक व विचारवंत इंद्रजित सावंत प्रमुख वक्ते म्हणून मांडणी करणार आहेत तर अध्यक्ष म्हणून लोकराज्य जनता पार्टीचे नेते अनिल चव्हाण, सन्माननीय उपस्थिती म्हणून सामाजिक विचारवंत प्रा. धनंजय बेडदे हे उपस्थित राहणार आहेत.
विशेष बाब म्हणजे यावेळी रोज एक असा शिवरायांच्या विचारांचा आपल्या कृतीतून जागर करणारे शिव महोत्सव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर संकल्पक डॉ. प्रवीण कोडोलीकर, संभाजी ब्रिगेड, कागलचे नेते बाळासाहेब पाटील, श्रीमंत जिजाऊ फौंडेशनच्या प्रमुख साक्षीताई पन्हाळकर यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.या व्याख्यानमालेचे आयोजन अनिल म्हमाने, डॉ. कपिल राजहंस, प्रा. शोभा चाळके, ॲड. करुणा मिणचेकर, प्रा. मिनल राजहंस, सुरेश केसरकर, चंद्रकांत सावंत, दयानंद ठाणेकर, विमल पोखर्णीकर, रवींद्र मोरे, संतोष बिसुरे, पी. के. पाटील, शशिकांत जाधव, अमोल कांबळे, सिध्दार्थ कांबळे, चंद्रनील सावंत यांनी केले असून कोल्हापूर जिल्ह्यातील शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रक अनिल म्हमाने यांनी केले आहे.


