



🔸हिरापुरच्या शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश
✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.15फेब्रुवारी):-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे गेवराई विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, या आनंदाच्या परिस्थितीमध्ये जुन्या-नव्या कार्यकर्त्यांची सांगड घालून येणाऱ्या काळात आपल्याला काम करायचे आहे, त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी एकमेकांना विश्वासात घेऊन एकजुटीने काम करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केले. हिरापूर येथे शेकडो शिवसैनिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला याप्रसंगी ते बोलत होते.
गेवराई विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत असून पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार अमरसिंह पंडित आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्धार करत तालुक्यातील भाजपा-सेनेचे असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. दिनांक १४ फेब्रुवारी रोजी
हिरापूर येथील शिवसेनेचे कट्टर समर्थक
अमजद भाई पठाण यांच्यासह बंडू मुंजाळ, महारुद्र मुंजाळ, नजीर शेख, हमीद शेख रेहान शेख, शेख जमीर, शेख अकबर, पठाण आफ्रिदी, पठाण समशेर, पठाण, माजेद शेख, गफार पठाण, शौकत पटेल, असद पटेल, राहुल मुंजाळ, नितीन काळे, शिराज तांबोळी, कदीर शेख, चेतन बहिर, संतोष उफाडे, सादेक शेख, इफ्तार शेख, मुबारक शेख, चक्रधर काळे, राईस तांबोळी आदी शेकडो शिवसैनिकांनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला. अमरसिंह पंडित यांनी त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत केले.
यावेळी सरपंच इम्मु पटेल, मुजीब पठाण, फारुक पटेल, संतोष चव्हाण, संतोष नाटकर, अमोल कोंढरे, बाळासाहेब बिर्गणे, महादेव गरड, विशाल तौर, समीर पटेल, दत्ता तिपाले, भागवत चौधरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


