



✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(दि.15फेब्रुवारी):-येथील म्हसवड दहिवडी रोडवरील लोखंडी पत्रा, अॅग, गज व सिमेंट आदी बांधकामाचे साहित्य विक्रीचे शरद नारायण दिडवाघ यांच्या श्री समर्थ कृपा ट्रेडर्स या दुकानाचे सकाळी ९.४५ च्या दरम्यान दुकानाचे कुलूप निघत नसल्याने दुकानाच्या शेजारी रस्यांवर अनोळखी इसम उभा होता तो झाल्या जवळ आला व तो मला म्हणाला थांबा मी कुलूप उघडून देतो म्हणून कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला हि कुलूप निघाले नसल्याने तो इसम बाजूला सरला पुन्हा दुकानाचे मालक दिडवाघ यांनी आपल्या जवळील पैशाची बॅग शेजारील पोत्यावर ठेवली व दिडवाघ कुलूप काढत असताना दिडवाघ यांचा डोळा चुकवून पन्नास हजार रुपये असलेली बॅग घेऊन एका मोटारसायकलींवर बसुन चोरटे पसार झाले याबाबत म्हसवड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आसुन या चोरीचा तपास म्हसवड पोलीस करत आहेत सकाळी सकाळी झालेल्या या चोरी मुळे आधीच दोन दिवसा पासुन घरफोडीच्या सत्रा मुळे शहरात भिती निर्माण झाली असतानालोखड विक्रीच्या व्यापारीयांची दिवसाढवळ्या पन्नास हजाराची बॅग नेल्याने पुन्हा भिती निर्माण झाली आहे.
याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यात शरद दिडवाघ रा दिडवाघवाडी ता माण यांनी दिलेली माहिती या प्रमाणे आज सोमवार रोजी सकाळी ९.४५ वाजता दिडवाघ हे आपले दुकान उघडण्यासाठी आले काल रविवार असल्याने बँकेला सुट्टी असल्याने दिवसभर विकलेल्या मालाची रक्क बॅकेत भरणा केला नव्हता आज सोमवारी तो भरणा करण्यासाठी बॅग घेऊन आले होते कुलूप निघत नव्हते कुलूपात पातळ लिक्विड व पावडर सारखा पदार्थ चिकट असल्याने कुलूप निघत नव्हते आधीच दबा धरुन उभा राहिलेल्या इसमाने ते कुलूप काढण्यासाठी प्रयत्न केल्याचे प्रथम दर्शनी दाखवले तो हि म्हणाला कुलूप नाही निघत म्हणून तो इसम बाजूला सरला पुन्हा कुलूप काढण्यासाठी दिडवाघ पुढे आले येताना शटर शेजारी पोती होती त्यावर पन्नास हजार रुपये असलेली बॅग ठेवली व कुलूप काढण्यात गुंतले असताना त्या अनोळखी इसमाने ती एक्कावन्न हजार रुपये असलेली बॅग व उधारीवर वही असलेली बॅग घेतली व दुकानापासुन चालत दहा पवले पुढे गेला मागून नंबर प्लेट नसलेली मोटारसायकल आली त्यावर तोबॅग घेतलेला इसम मोटारसायकलवर बसला व दहहिवडीच्या बाजूने सुसाट निघून गेला त्याच वेळी दिडवाघ यांच्यासमोर तुपे यांचे असलेल्या चहाच्या टपरी मध्ये दोन अनोळखी इसम दिडवाघ यांच्या दुकानातील हालचालीकडे लक्ष ठेवून होते त्या चहाच्या दुकानातून एकाने कुरकुरे, बिस्किटे घेतली होती.
त्या दोघांनी हि मास्क घातले होते तुपे यांना यासर्व हालचालीची शंका आल्याने तो अनोळखी इसम बॅग घेऊन जाताना चहाच्या टपरी वरील दोघे हि दुसऱ्या मोटार सायकल वरुन त्या दोघांचा मागे गेली मला शंका आल्यावर तुपे यांनी दिडवाघ यांना हाक मारली मात्र त्यांना काहीच कळाले नाही चोरटे माणगंगा नदीच्या पुलाच्या पुढे गेल्यावर बॅग गेल्याचे लक्षात आल्यावर दिडवाघ यांनी त्या दोन मोटारसायकली वरील चौथा चार्ल्स पाठलाग केला मात्र चोरटे सापडले नाहीत चार हि चोरट्यांनी मास्क घातल्याने ओळखू येत नव्हते परिसरातील सर्व सीसीटीव्ही पोलिस तपासणी करत आहेत संशयीत म्हणून सहा लोकांना ताब्यात घेतले होते त्यांचा उशीरा पर्यत चौकशी सुरु होती


