



🔹मीडिया प्रमुख पप्पुभाई शेख यांनी मागणी
✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमुर(दि.14फेब्रुवारी):-शहर कांग्रेसच्या वतीने चिमुर नगर परिषदेमध्ये कायमस्वरूपी आणि अनुभवी व कुशाल नेतृत्वपुर्ण मुख्यधिकारी द्यावे जेणेकरून जनतेच्या समस्या मार्गी लागल चिमुर नगर परिषदेमध्ये सध्यस्थीत चिमुर तहसीलचे नायब तहसीलदार पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याकडे प्रभारी मुख्यधिकारी म्हणून जबाबदारी सोपविलेली आहे. महत्वाचे म्हणजे गेल्या ६ महिन्यापासुन चिमुर शहरात नळ पाईप लाईनचे काम सुरु आहे. दरम्यान पक्के रोड नाल्या याची स्थिती अतिशय दुर्दैवी झाली आहे. आणि नगर परिषदमध्ये मुख्यधिकारी हे पूर्णवेळ नसल्यामुळे गावातील जनतेच्या समस्येप्रति दखल घेण्याकरिता उपययोजना होताना दिसत नाही आहे.
परिणामी आरोग्याचे प्रश्न, घाणेचे साम्राज्य ,रोड व नाल्याची दुरावस्ता झालेली आहे. आणि नळाच्या पाण्यात सुद्धा नारू निघत आहे. असे अनेक विषयांवर समस्यांचा निवेदन मा.जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांना मा. उपविभागीय अधिकारी साहेब उपविभागीय कार्यालय चिमुर यांचे मार्फत देण्यात आले आहे. यावेळी तालुका कांग्रेसचे अध्यक्ष संजय घुटके, तालुका महिला अध्यक्षा सविता चौधरी, शहर अध्यक्ष अविनाश अगडे, मिडीया प्रमुख पप्पुभाई शेख , माजी नगरसेवक नितीन कटारे, तालुका सरचिटणीस विलास मोहिणकर, विधानसभा युवक काँग्रेसचे महासचिव प्रवीण जीवतीडे, विधानसभा यवूक उपाध्यक्ष मंगेश घ्यार , इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.


