Home महाराष्ट्र सामाजिक योद्धा गणपत रेड्डी या युगाचा वीर फकीरा.. सचिनभाऊ साठे

सामाजिक योद्धा गणपत रेड्डी या युगाचा वीर फकीरा.. सचिनभाऊ साठे

228

🔸समाजाने गणपत रेड्डी यांना दीड लाख देऊन केले सन्मानित.

✒️नायगाव प्रतिनिधी(हानमंत चंदनकर)मो:-8767514650

नायगाव(दि.14फेब्रुवारी):-समाजात बदल होण्यासाठी योध्याची भूमिका घ्यावी लागते उपाशी समाजाला जगविण्यासाठी वीर फकिरानी रणांगणी उतरला होता म्हणून ते जगले होते. समाज स्वाभिमानाने जगावा यासाठी समाजाच्या विविध प्रश्नांविषयी रस्त्यावर लढणारा सामाजिक योद्धा गणपत रेडी या युगाचा वीर फकीर आहे. असे परखड मत सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे यांनी स्वाभिमानी मातंग परिषदेत व्यक्त केले.

नायगाव येथे समाजाच्यावतीने स्वाभिमानी मातंग परिषद व सन्मान सोहळा या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी माजी आमदार वसंतराव चव्हाण तर उद्घाटक म्हणून मानवहित लोकशाही पक्षांचे अध्यक्ष सचिन भाऊ साठे सत्कारमूर्ती आ. जितेशभाऊ अंतापूरकर, विशेष सन्मान स्मृती निष्ठावंत कार्यकर्ता गणपत रेड्डी यासह प्रमुख पाहुणे म्हणून टि. एम. कांबळे, गणेश भगत, डॉ. एच.आर. गुंटूरकर, डॉ. मुकुंदराव पाटील बेलकर, प्रा. रवींद्र पाटील चव्हाण, नामदेव कांबळे यांची उपस्थिती होती समाजाच्या वतीने आ. जितेश अंतापूरकर यांनी सन्मान स्वीकारल्यानंतर मी आमदार नात्याने सचिन भाऊ साठे यांना अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या अध्यक्षपदी तर निष्ठावंत कार्यकर्ता गणपत रेड्डी यांना दलित मित्र पुरस्कार साठी शिफारस करण्याचे समाजाला ते आश्वासन दिले.

तर आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार वसंतराव चव्हाण म्हणाले की, समाजाने निष्ठावंत गणपत रेड्डी चा बहुमान केले हे कौतुकास्पद असून मी देखील आपल्या अडीअडचणीत सहभागी राहीन आ. जितेश भाऊ अंतापूरकर यांना निवडून देण्यासाठी समाजही पुढे आला होता आणि आम्हीदेखील विडा उचलला होता म्हणून त्यांचा विजय प्राप्त झाला. पूर्वीपासूनच समाज आपल्या सोबत असल्याने आपल्यासाठी मी सदैव राहीन असेही ते म्हणाले. नायगाव तालुक्यातील समाज बांधव व कर्मचारी बांधवांनी एकत्र येऊन आयोजित केलेल्या स्वाभिमानी मातंग परिषद या कार्यक्रमात कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष पंढरी भालेराव यांच्या पुढाकाराने समाजांचा निष्ठावंत कार्यकर्ता गणपत रेड्डी यांना एक लाख 50 हजार रुपये देऊन मान्यवरांच्या हस्ते समाज बांधवांच्या साक्षीने सन्मानित केले या सन्मानाचा स्वीकारून गणपत रेड्डी यांनी समाज बांधवांचे जाहीर आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here