



✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.14फेब्रुवारी):-शहरातील इन्फिनिटी गणित वाचनालय द्वारे विद्यार्थ्यांची गणित विषयात रुची वाढावी या उद्देशाने *गणित जीवनाचा पाया*’ या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .या स्पर्धेचा पारितोषिक व प्रमाणपत्र वितरण सोहळा रविवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी शहरातील सारडा कॉलनी येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ममता विद्यालयाचे मुख्याध्यापक गोविंद चोरघडे तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम निर्मिती मंडळाचे सदस्य श्रीपाद देशपांडे ,माहेश्वरी सभेचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ मंत्री, वाचनालयाचे संस्थापक दिलीप सारडा , सचिन हराळे, मारोतराव साळवे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमेरिकेत स्थित असलेले गंगाखेड चे सुपुत्र व ज्यांच्या संकल्पनेतून हे वाचनालय व ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली असे अभियंता राधेश्याम सारडा यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे द्वारे केले. या स्पर्धेत एकूण 31 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला .स्पर्धा पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी या दोन गटात झाली. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले. तर दोन्ही गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र, तर आठ विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्र व बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ मंत्री यांनी केले, तर आभार प्रदर्शन आयोजक दिलीप सारडा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष नरवाडे, राम कासांडे, गोपाल सारडा, गंगाधर देशमुख, मिथिलेश तुपकर आदींनी प्रयत्न केले .





