



✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.14फेब्रुवारी):-आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर येथे पालकसभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ३५ पालकांनी सहभाग नोंदविला. आपल्या पाल्याच्या अडचणीवर तसेच महाविद्यालातून मिळणा-या सोयी-सुविधावर चर्चा झाली. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
सदर कार्यक्रमात प्राचार्य डॉ. शुभांगी लुंगे, पालकसभा सेल प्रमुख डॉ. रागिणी मोटघरे, दिवाकर कुमरे, सुभाष शेषंकर, डॉ. चंद्रभान खंगार, दामोधर सातपैसे, सुधाकर गोडे, मधुकर वंजारी, सुधाकर गोडे, कश्यप कोसे, याच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पालकसभा संपन्न झाली. पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कोविड १९ च्या नियमाचे पालन करून पालक सभा यशस्वी झाली.


