Home बीड बीडच्या सह्याद्री देवराईला आग; जवळपास 2 एकरावरील झाडं जळून खाक

बीडच्या सह्याद्री देवराईला आग; जवळपास 2 एकरावरील झाडं जळून खाक

223

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी,बीड)मो:-9075913114

बीड(दि.14फेब्रुवारी):-सिने अभिनेता सयाजी शिंदे यांच्या कल्पनेतून उभा केलेल्या बीड मधील सह्याद्री देवराईला भीषण आग लागली होती. या आगीत जवळपास 500 झाडं जळून खाक झाले आहेत. तर आग लागली नसून लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अभिनेता सयाजी शिंदे यांनी गेल्या चार वर्षांपूर्वी 14 फेब्रुवारी या दिवशी, बीड पासून काही अंतरावर सह्याद्री देवराईची जोपासना केली होती. आज हे सह्याद्री देवराई एक पर्यटन केंद्र बनत चालले आहे. शनिवार आणि रविवार या दिवशी या ठिकाणी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील जमते.

कारण जगातलं पहिलं वृक्ष संमेलन याच सह्याद्री देवराई मध्ये झालं होतं. वडाच्या झाडाला या कार्यक्रमाचे अध्यक्षपद अभिनेता सयाजी शिंदे यांनी दिलं होत. त्यामुळे ही सह्याद्री देवराई राज्यात चर्चेत आली होती. मात्र आता या सह्याद्री देवराई ला आग लागल्याने जवळपास दोन एकरचा परिसर जळाला असून यामुळे पाचशेच्या आसपास वड, लिंबू, पिंपळ आदी झाड जळून खाक झाली आहेत. दरम्यान या झाडाविषयी सह्याद्री देवराईसाठी काम करणाऱ्या, सामाजिक कार्यकर्त्यांसह वृक्ष प्रेमींनी संवेदना व्यक्त करत, ज्याने कोणी हे केला आहे. त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

दरम्यान बीड जिल्ह्यात पडत असणारा सततचा दुष्काळ, कुठे तरी दूर व्हावा आणि जिल्ह्यात पर्यटन केंद्र बनावे. या उद्देशाने अभिनेता सयाजी शिंदे यांनी ही सह्याद्री देवराईची स्थापना केली होती. मात्र काही विकृतीच्या लोकांकडून कुठंतरी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं दिसत आहे.

Previous articleसंस्थानिके ताब्यात घेण्यासाठी सहकार क्षेत्राचा पाया शिवसैनिकांनी भक्कम करावा – प्रदिपकुमार खोपडे
Next articleपंडीत दीनदयाल उपाध्‍याय यांच्‍या एकात्‍म मानववादाचा विचार जनाजनापर्यंत पोहचवा – आ. सुधीर मुनगंटीवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here