Home बीड संस्थानिके ताब्यात घेण्यासाठी सहकार क्षेत्राचा पाया शिवसैनिकांनी भक्कम करावा – प्रदिपकुमार खोपडे

संस्थानिके ताब्यात घेण्यासाठी सहकार क्षेत्राचा पाया शिवसैनिकांनी भक्कम करावा – प्रदिपकुमार खोपडे

99

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.14फेब्रुवारी):-जिल्हा शिवसेनेच्या वतीने नुकतीच शिव सहकार सेनेची बैठक पार पडली. या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार शिव सहकार सेनेचे राज्य उपाध्यक्ष मा.प्रदीपकुमार खोपडे साहेब यांनी मार्गदर्शन केले. विना सहकार नाही उद्धार,सहकाराचा पाया मजबूत असेल तर छोटे छोटे संस्थानिके,ताब्यात घेण्याची ताकद निश्चित शिवसैनिकात निर्माण होईल,यासाठी येणाऱ्या काळात काळजीपूर्वक लक्ष देण्याचा मोलाचा सल्ला प्रदीपकुमार खोपडे यांनी शिवसैनिकांना दिला.

सेवा सहकारी सोसायटी,बचतगट,पतसंस्था दूध संघ, मध्यवर्ती बँका, बाजार समित्या, यासारख्या विविध सहकारी संस्था केवळ गांभीर्याने न घेतल्यामुळे शिवसैनीकाच्या हातून निसटतात हीच बाब लक्षात घेऊन मा.पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेब यांनी शिवसेना पक्ष सहकार क्षेत्रात वाढविण्यासाठी दिलेल्या आदेशानुसार शिवसेना सन्माननीय नेते मराठवाडा संपर्क प्रमुख चंद्रकांतजी खैरे साहेब, उपनेते तथा मराठवाडा विभागीय समन्वयक मा. विश्वनाथजी नेरूरकर साहेब व शिव सहकार सेनेच्या राज्य प्रमुख सन्माननीय शिल्पाताई सरपोतदार यांनी सबंध महाराष्ट्रात शिवसैनिकांना सहकाराचे महत्त्व जाणीव करून देण्यासाठी शिव सहकार सेनेची स्थापना केली असल्याचे प्रदीपकुमार खोपडे यांनी सांगितले.

सहकार क्षेत्रातले बारकावे माहित नसल्यामुळे व योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे केवळ विशिष्ट वर्गाची मक्तेदारी वाढत गेली.शिवसेनेच्या नवीन सहकारसेनेच्या शाखेच्या माध्यमातून ही पोकळी भरून काढण्याचे काम निश्चित केले जाईल असे यावेळी मनोगत करताना शिवसेना मा.जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप यांनी सांगितले.

या बैठकीस जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनीही आपले विचार मांडले,तसेच जिल्हा पदाधिकारी,उप जिल्हाप्रमुख,तालुका प्रमुख यांनी आपले मत व्यक्त करून सहकाराला बळकटी देण्याचा माणसं निर्माण केला. यावेळी बैठकीस शिवसेना माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळुक,माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे,माजी नगराध्यक्ष दिलीप गोरे,किसान सेना जिल्हा संघटक परमेश्वर सातपुते, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक संगिता चव्हाण, चंद्रकला बांगर, न.प.माजी सभापती सुनिल अनभुले, जिल्हा समन्वयक बप्पासाहेब घुगे, उप जिल्हाप्रमुख गणेश वरेकर,मा.तालुका प्रमुख उल्हास गिराम, युवासेना जिल्हाधिकारी सागर बहिर,अभिजीत बरिदे,शुभम डाके,रामराजे सोळंके,विनायक मुळे,नगरसेवक संजय उडाण,आजिनाथ खेडकर,किरण चव्हाण,रत्नाकर शिंदे,गोरख सिंघण,संदीप माने,सुशील पिंगळे,रामदास ढगे,शिक्षक सेनेचे बहिरवाळ सर,सुधीर शिंदे,किसन कदम,साहेबराव पोपळे,पंकज कुटे,सुनील सुरवसे, प्रदीप माने,प्रदीप कोटुळे,नानासाहेब घाल्लाळ,उध्दव काकडे,नवनाथ शिंदे, बंटी धनवे,राजेश मोरे,महादेव आंधळे,सचिन धपाटे,मुकेश शिवगण,अक्षय काशीद,अरुण भोसले,गणेश जाधव,बंडू मामा जाधव,सूर्यकांत जगताप यांच्यासह सर्व तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीसह ही शिव सहकार सेनेची आढावा बैठक पार पडली यावेळी शिवसेना,युवासेना पदाधिकारी,महिला आघाडी पदाधिकारी,शिवसेनेच्या सर्व अंगीकृत व अधिकृत संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उत्स्पूर्थपने उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here