Home बीड शहजानपुर चकला अल्पवयीन मुलांच्या मृत्युप्रकरणात प्रशासकीय आधिका-यांवर गुन्हे दाखल करा; तोडलेल्या कडुनिंबाच्या...

शहजानपुर चकला अल्पवयीन मुलांच्या मृत्युप्रकरणात प्रशासकीय आधिका-यांवर गुन्हे दाखल करा; तोडलेल्या कडुनिंबाच्या झाडाला श्रद्धांजली

60

🔹आंदोलनकर्त्यांचा साक्षीदार असलेल्या कडुनिंबाच्या झाडाला श्रद्धांजली

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.14फेब्रुवारी):-मौजे शहजानपुर चकला ता. गेवराई जि.बीड येथिल सिंदफणा नदीपात्रातील अवैध वाळु उत्खनामुळे ४अल्पवयीन मुलांचा बळी गेला असून संबधित प्रकरणात केवळ वाळुमाफियांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून या घटनेस जबाबदार संबधित स्थानिक ग्रामविकास यंत्रणा, महसुल व पोलीस प्रशासनातील आधिका-यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.

तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ६० वर्षीय कडुनिंबाचे झाड प्रशासनाने तोडल्यामुळे आंदोलकांची गैरसोय झाली असून “निवारा शेड “उभारण्याची रोटरी सेंट्रल क्लब बीड यांना परवानगी देण्यात यावी या मागण्यांसाठी आज दि. १४ फेब्रुवारी सोमवार रोजी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येऊन तहसिलदार महसुल जि. का.बीड मनिषा लटपटे यांना निवेदन देण्यात आले, आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर, सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद मोईज्जोदीन, अशोक कातखडे, शेख मुबीन, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ.संजय तांदळे आदि सहभागी होते.

आंदोलनकर्त्यांचा साक्षीदार असलेल्या कडुनिंबाच्या झाडाला श्रद्धांजली

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यालयासमोरील आंदोलनस्थळी असणारे ६० वर्षीय कडुनिंबाचे झाड नगरपरिषद प्रशासनाकडुन तोडण्यात आले असून आंदोलनकर्त्यांची हक्काची सावली हिरावली असुन उन्हातान्हात गोरगरीब जिल्हाप्रशासनाकडे न्याय मागण्यासाठी आंदोलनकर्त्यांची गैरसोय झाली असून आजच आंदोलनकर्ते यांना उन्हातान्हात धरणे आंदोलन करण्याची वेळ आली, त्यामुळेच आंदोलनकर्त्यामध्ये जिल्हाप्रशासनाविषयी रोष व्यक्त करण्यात आला.

तत्पुर्वी आयोजित केलेल्या शोकसभेत तोडलेल्या कडुनिंबाच्या झाडाला पुष्पहार, फुले अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी ज्येष्ठ पत्रकार बालाजी तोंडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक तांगडे,ऊसतोड मजुर नेते मोहन जाधव, सामाजिक कार्यकर्ते शार्दुल देशपांडे आदि उपस्थित होते.

Previous articleरस्ता बांधकाम पुर्णत्वास नेण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज – अमरसिंह पंडित
Next articleसंस्थानिके ताब्यात घेण्यासाठी सहकार क्षेत्राचा पाया शिवसैनिकांनी भक्कम करावा – प्रदिपकुमार खोपडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here