Home बीड रस्ता बांधकाम पुर्णत्वास नेण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज – अमरसिंह पंडित

रस्ता बांधकाम पुर्णत्वास नेण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज – अमरसिंह पंडित

185

🔹कोळगाव- कवडगाव रस्ता बांधकामाचा भव्य शुभारंभ

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी,बीड)मो:-9075913114

बीड(दि.14फेब्रुवारी):-कोळगाव आणि परिसरातील शेतकरी आणि व्यापारी बंधूंसाठी वाहतूक आणि दळणवळणचे साधन म्हणून मी तुम्हाला हा रस्ता तयार करून देत आहे. तुम्हा सर्वांना हा रस्ता फायदेशीर ठरणार असून रस्ता दर्जेदार आणि व्यवस्थित होण्यासाठी या कामाकडेे माझे विशेष लक्ष आहे. रस्ता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी काही अडचण येणार नाही, याकडे आपण सर्व गावकऱ्यांनी लक्ष देवून रस्ता बांधकाम होण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी केले. कोळगाव ते कवडगाव या रस्ताबांधकामाचा शुभारंभ करताना ते बोलत होते.

गेवराई तालुक्यातील मौजे कोळगाव ते कवडगाव रस्त्याच्या कामाचा शुभारंभ माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी माजी संचालक मदनराव घाडगे, राष्ट्रवादी वक्ता सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रदिप सोळंके, सरपंच विकास सानप, संदीपान दातखीळ, आसाराम बारहाते, रामदास कदम, राजेंद्र कदम, किशोर पारख, रमेश करांडे, आबासाहेब करांडे, भिमराव नेमाने, वसंत जोगदंड, सुरेश लोंढे, कल्याण धुमाळ, बिभीषण करांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कोळगाव ते कवडगाव रस्त्याच्या कामाची मागणी या भागातील शेतकरी, ग्रामस्थ, व्यापारी बंधूनी केली होती. त्याची दखल घेवुन माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी या रस्ता कामासाठी निधी मंजूर करून आणला. या कामाचा शुभारंभ करताना अमरसिंह पंडित पुढे म्हणाले की, रस्त्याच्या अडचणीमुळे शेतकरी बांधवांना खूप मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आता हा रस्ता झाल्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि सामान्य नागरिक यांना वाहतूक आणि दळणवळणाचे साधन म्हणून या रस्त्याचा वापर करता येईल. स्थानिक पातळीवर या कामासाठी कांही अडचणी निर्माण होणार नाहीत याची दक्षता सर्व गावकऱ्यांनी घेतली पाहिजे. काम दर्जेदार होण्यासाठी मी स्वतः लक्ष देणार असून आपणही रस्त्याला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी कोळगाव, कवडगाव आणि परिसराती गावकरी, कार्यकर्ते,राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here