




✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.13फेब्रुवारी):-बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणारे लिंबाचं झाड प्रशासनाची डोके दुखी ठरत होती. आज अखेर या झाडावर तोडक कारवाई करण्यात आली आहे. अचानक कारवाई केली जात असल्यानं वृक्ष प्रेमींसह सामाजिक कार्यकर्त्यांनी याला रोखले होते.मात्र अखेर या झाडावर कुऱ्हाड चालवण्यात आली. या झाडावर चढून अनेक आंदोलनकर्त्यांनी आंदोलन केले होते.
त्यामुळे ही कारवाई झाली आहे. नगर परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांनी वेतन मागणी साठी झाडावर चढून आंदोलन केले होते.त्यामुळे या महिलांना उतरविण्यासाठी खुद्द आमदारांना देखील झाडावर चढावे लागले होते. त्यामुळे या झाडाला कुंपण करण्याची मागणी केली जात होती.




