




✒️माधव शिंदे(नांदेड जिल्हा,प्रतिनिधी)
नांदेड(दि.13फेब्रुवारी):- ते हैद्राबाद रोडवर कहाळ्या जवळ अपघात होऊन बरबडा येथील महम्मद यासिन हया तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. तो तरुण अविवाहित होता. त्यांच्या बहिणीचे लग्न 21 फेब्रुवारी 2022 ला आहे. अशातच अशी दुःखाची घटना घडल्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने सर्व परिसर हळहळ करत आहे. त्या कुटूंबाचा तो तरुण आधार होता सर्व त्याच्यावर कुटूंबाचा उदरनिर्वाह चालत होता. त्याच्या कुटूंबात 3 बहिणी 2 भाऊ आईवडील असा परिवार होता.
घरातील एकमेव तोच मुलगा हुशार कर्तबगार शांत स्वभाव असल्याने आणि त्यांचे जास्त शिक्षण असल्यामुळे तो मौलिसाब म्हणून कहाळ्याला शिकवण्याचे काम करीत होता.तोच आता नसल्याने ते कुटुंब पार कोलमडून पडून गेले असल्याने त्याच्या कुटूंबाला आधार देण्यासाठी त्या तरुणाच्या वडिलांची 1989 वर्षाची 10 वी ची मित्रमंडळी वर्गमित्र 40 जण यांनी एकत्र येऊन त्या कुटूंबाला मदत म्हणून देणगी च्या स्वरूपात केली. त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी म्हणून हि मदत केल्याचे सांगण्यात आले.
या सहकार्य व मदतीमुळे सर्व गावाकऱ्यातून त्या वर्ग मित्रप्रेम असल्याचे कळते. हे सामाजिक बांधिलकी जपून हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक दिसून आले. यावेळी मौलीसाब हिराज शेख, माधव रेडेवाड, नागोराव तिप्पलवाड, माधव कंड्डापल्ले, हरि जंगलीवाड, गोविंद भुसलवाड, बालाजी तेलंग, बालाजी जक्कीलवाड, भागवत आनेमवाड, शिवाजी हनमंते, प्रजावाणी पत्रकार मारोती बारदेवाड, गौस शेख, अरुण भुसलवाड, देशोन्नती पत्रकार किरण हनमंते, यांच्या उपस्थितीत त्या तरुणाच्या घरच्यांना जवळपास 40,000 हजारची मदत देण्यात आली.




