



✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
वडवणी(दि.13फेब्रुवारी):- भारतातील आणि ईतर काही देशातील बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असणारे थोर समाजसुधारक, राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची १५फेब्रुवारी रोजी २८३वी जयंती असून जयंतीच्या निमित्ताने बंजारा समाज बांधवाने प्रत्येक तांड्यात जयंती साजरी करावी असे आवाहन सेवालाल सेना संस्थापक तथा ओबीसी आरक्षण कृती समितीचे निमंत्रक बी एम पवार यांनी केले आहे.या संदर्भात प्रसिद्धीस पत्रकात असे म्हटले आहे की, सेवालाल महाराज हे सुधारणावादी आणि मानवतावादी समाज सुधारक होते.
परंतु आम्हाला आजपर्यंत खरे सेवालाल महाराज कळाले नाही याची खंत वाटते.थोर समाजसुधारक, राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांनी अनिष्ट रुढीला आणि अंधश्रद्धेच्या विरोधात काम केले. समाज जोपर्यंत अंधश्रद्धा सोडणार नाही, सुधारणावादी विचार आत्मसात करणार नाही तोपर्यंत या समाजाचा विकास होणार नाही यासाठी आयुष्यभर जागृती केली. मानवतावादी विचार मांडला. सेवालाल महाराज हे फक्त समाजसुधारकच नव्हते तर भविष्यात काय परिणाम होणार आहे हे सांगणारे भविष्यवेता होते. सेवालाल महाराजांनी त्या काळात सांगितले होते की भविष्यात समाजात वाईट वेळ ऐनार असुन पाणी हे विकत घेऊन पिण्याची वेळ ऐनार आहे आणि त्या काळात जे काही सांगीतले होते त्या सर्व घटना आज समाजात घडत आहेत.
समाजसुधारकाना अभिप्रेत असलेला समाज घडविण्यासाठी आपण सर्वांनी मिळून संकल्प करुया. १५ फेब्रुवारी रोजी समाजसुधारक राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची जयंती प्रत्येक शासकीय कार्यालयात साजरी करावी त्याच प्रमाणे बंजारा समाज बांधवानी व ओबीसी, दलित, भटके जाती व विमुक्त जमाती आणि बहुजन समाजाने २८३ वी जयंती उत्साहात साजरी करून आपला स्वाभिमान जिंवत ठेवावा असे आवाहन बी एम पवार यांनी केला आहे.


