Home महाराष्ट्र ना.धनंजयजी मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली उद्या नंदागौळात मोफत श्रवणयंत्र वाटप शिबीराचे आयोजन!

ना.धनंजयजी मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली उद्या नंदागौळात मोफत श्रवणयंत्र वाटप शिबीराचे आयोजन!

356

🔹कानाची कॉम्प्युटराईजड मशिनने 500 रु. ची तपासणी मोफत!

🔸डॉ.संतोष मुंडे व युवकनेते सुंदर गित्ते यांच्या संयुक्त माध्यमातून उपक्रम

✒️अतुल बडे(परळी वैजनाथ,प्रतिनिधी)

परळी(दि.13फेब्रुवारी):-तालुक्यातील नंदागौळ येथे सामाजिक न्यायमंत्री ना.धनंजयजी मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे व युवकनेते सुंदर गित्ते यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील नागरिकांची कानाची कॉम्प्युटराईजड मशिनने मोफत तपासणी व श्रवणयंत्राचे मोफत वाटप उद्या रविवारी 22 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार असून यावेळी बीड येथील डॉ.जयशंकर तामसेकर व डॉ.मोहन मुळे उपस्थित राहणार असल्याची माहिती नंदागौळ ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त की,सामाजिक कार्यकर्ते व एनसीपी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ संतोष मुंडे व युवकनेते सुंदर गित्ते या दोघांच्या माध्यमातून नंदागौळ येथे 2012 पासून अनेक आरोग्य तपासणी विषयक शिबिरे,मोफत तपासणी तसेच अनेक श्रवणयंत्रांचे यापूर्वी वाटप केलेले आहे,परंतु सध्या अनेक नागरिकांची मागणी येत असल्याने गावातील नागरिकाना गावातच तपासणी व जाग्यावर श्रवणयंत्रांचे वापट करण्यात येणार आहे,कर्णबधिर असलेल्या नागरिकांच्या कानाची प्रत्येकी 500 रुपयांची कॉम्प्युटराईजड मशिनने मोफत तपासणी करण्यात येणार आहे,यासाठी रविवार दि 13 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 8 ते 12 या वेळेत गावातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामपंचायत,नंदागौळ च्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here