Home बीड मै झुकेगा नही.’ म्हणत आमदार संदीप क्षिरसागरांचा विरोधकांना टोला

मै झुकेगा नही.’ म्हणत आमदार संदीप क्षिरसागरांचा विरोधकांना टोला

76

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.13फेब्रुवारी):-दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन याच्या पुष्पा चित्रपटातील डायलॉग सध्या सुपर हिट झाले आहे. आता याच डायलॉगची भुरळ राजकीय पुढार्‍यांना देखील पडलेली दिसते. बीडमध्ये एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीसागर यांनी त्या चित्रपटातील डायलॉग बोलून दाखवला आणि उपस्थित लोकांनी देखील त्याला चांगलीच दाद दिली आहे.

आमदार संदीप क्षीरसागर यांची बीड जिल्ह्यात एक सभा होती. तिथे त्यांनी भाषण केलेला व्हिडिओ तुफान व्हायरल झालाय. त्या भाषणात आमदार क्षीरसागर म्हणतात, मी प्रत्येक निवडणुकीमध्ये सांगतोय, सर्व एक होऊन लढणार आहेत. हे चित्र तुम्हाला अजून सुद्धा दिसेल. जेव्हा लोक सोबत येत नाहीत, तेव्हा ही परिस्थिती होती. आणि ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा हे सर्व एकत्र येऊन लढणार. पण मला भीती नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

आमदार संदीप क्षीरसागर भाषणात आपल्या विरोधकांना इशारा देताना म्हणाले की, तु्म्ही सर्व एकत्र येऊन लढा. मला भीती नाही. कारण माझ्या आई-बहिणींचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. युवकांची ताकद माझ्यासोबत आहे. ज्येष्ठांची ताकद माझ्यासोबतय. मी पुष्पा पिक्चर पाहिला. त्या पिक्चरमध्ये डायलॉग होता. झुकेगा नही.एवढीमोठी निवडणूक लढली, ही तर नगरपालिकेची निवडणूक. त्याचं काय एवढं, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here