



✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.13फेब्रुवारी):-मोटारसायकल ही नित्योपयोगी वस्तू बनली असली तरी त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गहण झाल्याची स्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. त्यांना शोधून काढणे पोलिसांपुढे मोठे आव्हान ठरत आहे.परंतु प्रयत्न केले तर नक्कीच यश येऊ शकते हे नेकनुर पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.
पाटोदा शहरातील पत्रकार जावेद शेख हे काही कामानिमित्त दि.६/९/२०२1 रोजी खर्डा येथे गेले असता.रात्रीच्या वेळेस दारापुढे लावलेली मोटारसायकल क्र.MH.23A.H.0580 अद्न्यात चोरट्यांनी पळवली होती. या विरोधात खर्डा येथे तक्रार करण्यात आली होती मात्र येथील पोलिसांनी फक्त तक्रार नोंदवहीत नोंदवून घेतली मात्र त्यांची ऑनलाईन केली नाही. तीच गाडी नेकनुर पोलिसांना बेवारस स्थितीत आढळून आली होती. मात्र त्या गाडीची कुठेच ऑनलाईन तक्रार दिसून येत नसल्याने.एपीआय मुस्तफा शेख यांनी हवलदार मच्छिंद्र खाडे व सय्यद यांच्यावर गाडीच्या नंबर वरून तीचा मालक शोधून काढण्याची जबाबदारी टाकली होती.
त्यांनी हे आवाहन यशस्वीरित्या पार पाडत पाटोदा येथील पत्रकार शेख जावेद यांच्याशी संपर्क साधला व गाडी बद्दल माहिती विचारून घेतली व गाडीचे मुळ कागदपत्रे नेकनुर पोलीसांसमोर सादर करण्याचे सांगितले होते. त्यानुसार आज दि.11फेब्रुवारी शुक्रवार रोजी पत्रकार शेख जावेद यांनी गाडीचे पेपर सादर केले असता.गेल्या 5 महिन्यांपूर्वी चोरीला गेलेली गाडी नेकनुर पोलिसांनी जावेद शेख यांच्या स्वाधीन केली.यावेळी नेकनुर पोलीस स्टेशनचे मछिंद्र खाडे,गोविंद राख,अनिल राऊत, शेख शहजादा, सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, पत्रकार हमीदखान पठाण आदी उपस्थित होते.





