Home महाराष्ट्र मुस्लिम समाजाच्या वतीने रॅली काढून केली कारवाईची मागणी

मुस्लिम समाजाच्या वतीने रॅली काढून केली कारवाईची मागणी

231

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.12फेब्रुवारी);-भारत देश हा विविधतेने नटलेला असून सर्व जाती-धर्माचे नागरिक या देशांमध्ये राहतात . या सर्वांना एकत्र बांधण्याचे काम भारतीय संविधानाने केले आहे. पण निवडणुकी च्या काळामध्ये देशांमध्ये धर्माच्या नावावर भडकवण्याचे काम काही समाजकंटक मार्फत केले जात आहे. परंतु विद्यालय व महाविद्यालय या सारख्या पवित्र विद्याज्ञानाच्या ठिकाणी जाती-जातीमध्ये द्वेष निर्माण करण्याचे काम होताना दिसत आहे.

संविधानामध्ये काय खावे, काय प्यावे, कोणते कपडे घालावे हे अधिकार प्रत्येक व्यक्तीला दिले संविधानामध्ये दिला आहे दिनांक 11 फेब्रुवारी रोजी गंगाखेड येथे सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने रॕली काडुन कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याची नेहरू चौक या ठिकाणावरून सुरुवात करण्यात आली असुन घोषणाबाजी करीत शिवाजी महाराज चौक ,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्ग तहसीलदार यांना संबंधित समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव उपस्थित होते.सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने हाजी कौसर सलीम शेख या मुलीने मनोगत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here