



✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.12फेब्रुवारी):-कोरोनाचा संसर्ग पाहता यंदा ऑफलाईन परिक्षा घेण्याचा निर्णय घेतला असला तरी ज्या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण घेत आहे त्याच ठिकाणी परिक्षा घेतली जाणार आहे. बीड जिल्हयात दहावीचे १५६ मुख्य केंद्र असून ४७५ उपकेंद्र आहेत. तर बारावीचे ९९ केंद्रासह १७२ उपकेद्रांवर परिक्षा घेण्यात येणार आहे.दहावी आणि बारावीच्या परिक्षा या ठरलेल्या वेळेनूसारच घेण्यात येणार आहे. परिक्षा ऑफलाईनच होणार असल्याचा निर्णय मध्यंतरी शालेय शिक्षण मंत्र्यांनी घोषीत केले आहे. कोरोनाचा संसर्ग पाहता या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण घेत आहे.त्याच ठिकाणी परिक्षा केंद्र असणार आहे.
केंद्रासह उपकेंद्राची निर्मीती करण्यात आली. एका केंद्राला पाच ते सहा उपकेंद्र जोडण्यात आलेले आहे. बीड जिल्हयातील दहावीची परिक्षा १५६ मुख्य केंद्रासह ४७५ उपकेंद्रावर तर बारावीची परिक्षा ९९ मुख्य केंद्रासह १७२ उपकेंद्रावर घेतली जाणार आहे.दहावीची १५ तर बारावीची ४ मार्चला परिक्षा सुरू होणार राज्याच्या शिक्षण विभागाने दहावी आणि बारावीच्या परिक्षेेचे वेळापत्रक यापुर्वीच जाहीर केलेले आहे. त्यानूसार परिक्षा होणार आहे. दहावीच्या परिक्षेला १५ मार्च २०२२ पासून सुरूवात होणार आहे. तर बारावीच्या परिक्षेला ४ मार्च २०२२ पासून सुरूवात होईल.


