




✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114
बीड(दि.12फेब्रुवारी):-शॉट सर्किटमुळे उसाला आग लागल्याने या आगीत गेवराई तालुक्यातील बेलगुळवाडी शिवारातील शेतकर्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदरील हा ऊस तोडणीला आला होता तोच आग लागल्यामुळे शेतकर्याला नुकसान सहन करावे लागले.गेवराई तालुक्यातील ठाकर आडगाव येथील दिनकर सदाशिव कोकाट या शेतकर्याचा बेलगुळवाडी शिवारात चार एकर ऊस होता.
आज सकाळी शॉट सर्किट होऊन ऊसाला आग लागली. या आगीमध्ये संपुर्ण ऊस जळून खाक झाला. यात शेतकर्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ऊस जवळपास बारा ते तेरा महिन्याच्या कालावधीचा होता. तोडणीला आलेला ऊस जळाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत शेतकर्याने वीज वितरण कार्यालयाकडे तक्रार दाखल केली आहे.




