



✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
पुणे(दि.12फेब्रुवारी):-कर्नाटक या राज्यात शैक्षणिक संस्था मधून कांही धर्मांध शक्ती व कांही विघटनवादी, जातीयवादी राजकीय पक्षानी फूस लावून विद्यार्थ्यांमार्फत हिजाब विरोधात जे आंदोलन केले त्याचा निषेध म्हणून व त्याचे महाराष्ट्रात प्रतिकूल प्रतिसाद उमटू नयेत म्हणून मा. जिल्हाधिकारी पुणे यांना आज दि ११ रोजी पुणे शहर वंचित बहुजन आघाडीचे वतीने निवेदन देण्यात आले, सदर निवेदन निवासी जिल्हाधिकारी मा हिम्मतराव खराडे साहेब यांनी स्वीकारून सकारात्मक प्रतिसाद दिला व सदर निवेदनाबाबत मा. मुख्यमंत्री साहेबाना अवगत करण्याचे आश्वासित केले,.
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष मा. मुन्नवर भाई कुरेशी, महासचिव ऍड अरविंद तायडे, जितेंद्र जाधव, महेश कांबळे, प्रतिभा रंगारी, वैशालिताई गायकवाड, अक्षय तायडे, अजहर इस्माईल ओंकार कांबळे, रेखा चौरे, विशाल सरवदे, फाय्याज सय्यद, बी पी सावळे, नासिर शेख, बल्लूभाई, मा. विकास भेगडे, बाबासाहेब वाघमारे, मयूर कांबळे, शेख गुलशन, शेख खालीजा, वालीतझा शेख, सुफिया शेख,अलजिया जावेद शेख, सविता चाबुकस्वार,लीना वानखेडे,निरंजना सोनावणे,इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


