



✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)
घुग्घुस(दि.12फेब्रुवारी):-परमपूज्य श्री.माताची निर्मला देवीच्या अनुरूपान सहजजी ध्यानकेंद्र निर्मलयोगी मोरवा व घुग्घुस येथील रामनगर वार्ड क्रमांक ५ येथे राममंदिरात हळद कुंकूचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.याप्रसंगी भारताची गानसम्राज्ञी कोकीळा स्व.लतादीदी मंगेशकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.प्रमुख पाहूणे म्हनुन माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीनिवास इसारप, मंदिराचे पंडित विनोद सेहगल,घनश्याम चानीकर हरिश रबडे उपस्थित होते.
हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला शेकडो महिला उपस्थित होते,श्री.माताजी निर्मल देवीच्या आशीम कृपेने आत्मसाक्षात्कार प्राप्त केला व आनंद अनुभुती प्राप्त केली आणि महिलांना वाण देण्यात आले,घुग्घुस येथील नागरिकांनी ध्यान साधनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असुन रामनगरच्या राममंदिर कमेटीचे आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमात चंद्रपूर येथील सहजी सौ.आरती पंजाबी, सौ.भावना लेखवाणी, सौ.प्रतिभा लोखंडे, सौ.प्रतिभा घडीवार, घुग्घुस मध्ये कार्यक्रम आयोजन करणारे सहजी सौ,ज्योती पानघाटे, सौ.किरण सोनटक्के, सौ.मंगला धोबे, सौ.छाया पाचभाई, सौ. प्रणिता माहुलकर, सौ.माथुलकर, सौ.बेबीताई खाडे, सौ.लता कारेकर, सौ. शोभाताई पिंपडशेंडे, सुनंदा पिंपळशेंडे, व महिला मोठयासंख्येत महिला उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन सौ. प्रीती छत्रीवार यांनी केले व आभार प्रदर्शन करून कार्यक्रम समाप्त करण्यात आला.





