



✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
यवतमाळ(दि.12फेब्रुवारी):-कर्नाटक राज्यातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब परिधान केलेल्या मुस्लीम विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यानंतर शिवमोगा,गडकर व राज्याच्या कानाकोपऱ्यात हिजाब विरोधात व समर्थनार्थ अनेक आंदोलन करण्यात आली आहेत.शिवमोगा महाविद्यालयात हिजाब घालण्या वरून काही विद्यार्थ्यांनी भगवा ध्वज फडकाविला होता.
भगवा ध्वज फडकाविण्या संदर्भात प्रतिक्रिया देताना कर्नाटक राज्याचे ग्रामीण विकास राज्यमंत्री के.एस.ईश्वर अप्पा यांनी दि 9 /2 /2022 रोजी प्रतिक्रिया देताना म्हणाले की भविष्यात लवकर देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा ऐवजी भगवा असेल असे वादग्रस्त व असंवैधानिक विधान केले आहे.
त्यामुळेच त्यांना संविधानिक पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यामुळे त्यांनी लवकरच आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे अशी भीम टायगर सेनेच्या वतीने मी मागणी करतो.
भारतीय संविधान भाग 6 state अर्थात अर्टिकल 164 ( 3) अनुसूची( 5) नुसार मंत्रीपदाची शपथ घेताना सांगतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारताच्या संविधाना बद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन.
भारताची सार्वभौमता,एकात्मता व अखंडता राखीन संविधान व कायदा या नुसार सर्व जाती धर्माच्या लोकांना निर्भयपणे व निपक्ष पातीपणे तसेच कोणाविषयी ममत्वभाव आकस न बाळगता न्याय वागणूक देईल.असे असताना मंत्री के.एस.ईश्वरअप्पा यांनी एका धर्माचे प्रतीक असलेल्या भगव्या ध्वजाला देशाचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा ऐवजी भगव्या ध्वजाला करणार असे म्हणून त्यांनी भारतीय संविधानाला,
भारतीय अखंडतेला, धर्मनिरपेक्ष पणाला तडा देऊन राष्ट्रद्रोह केलेला आहे. भारतीय संविधान भाग 4 A fundamental right अर्थात मूलभूत कर्तव्य मध्ये 1 ) संविधानाचे पालन करणे 2 ) राष्ट्रध्वज यांच्या विषयी आदर बाळगणे हे मंत्री के.एस.ईश्वर आप्पा यांचे मूलभूत कर्तव्य आहेत.
पण त्यांनी जाणून बुजून मनुवादी मानसिकतेतून व देशाला हिंदु राष्ट्र करण्याच्या उद्देशाने व तसे हिंदु राष्ट्राचे वातावरण निर्माण करण्यासाठी आपल्या देशाचा संविधानिक राष्ट्रध्वज तिरंगा असताना देशाचा राष्ट्रध्वज लवकरच भगवा ध्वज असेल असे सांगितले.
त्यानी असे म्हणणे म्हणजे हिंदु राष्ट्र बनविण्याच्या वातावरण निर्मितीसाठी टाकलेले पहिले पाऊल आहे.असे पहिले पाऊल वेळीच छाटले पाहिजे यासाठीच मंत्री के.एस.ईश्वरअप्पा यांच्यावर भारतीय दंड विधान 124 अ नुसार देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अशांना भरचौकात फाशी दिली पाहिजे तरच के.एस. ईश्वरप्पा व त्यांच्या पिल्लावळीचे हागणे मुतणे कायमचे बंद होईल.
अशी महत्त्वपूर्व माहिती आमच्या प्रतिनिधी ला बोलतांना
मा.दादासाहेब शेळके (राष्ट्रीय अध्यक्ष भिम टायगर सेना मो.8766744644) यांनी दिली.





