Home महाराष्ट्र खळबळजनक..! राक्षसभुवन येथील शेतात आढळला मृतावस्थेत बिबट्या

खळबळजनक..! राक्षसभुवन येथील शेतात आढळला मृतावस्थेत बिबट्या

365

🔸राक्षसभुवन परिसरात भितीचे वातावरण

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

गेवराई(दि.12फेब्रुवारी):-तालुक्यातील राक्षसभुवन येथील एका शेतात आज सकाळी मृतावस्थेतील बिबट्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शवविच्छेदनानंतरच या दोन ते तीन वर्ष वयाच्या बिबट्याच्या मृत्यूचे कारण पुढे येणार आहे.

लक्ष्मण नाटकर यांचे राक्षसभुवन येथे शेती आहे. गोदावरी नदी काठावर असलेल्या सकाळी ते शेतात गेले होते. यावेळी त्यांना शेतात मृतावस्थेतील बिबट्या दिसून आला. घाबरलेल्या नाटकर यांनी ग्रामस्थांना बोलवून घेतले. ग्रामस्थांनी याची माहिती वनपाल देविदास गाडेकर यांना दिली.

शेतात जाऊन वनपाल गाडेकर यांनी मृत बिबट्याची पाहणी केली आहे. बिबट्याचे वय दोन ते तीन वर्ष असू शकते. तसेच त्याच्या शरीरावर कुठलीही जखम आढळून आली नाही. यामुळे शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट केले होईल, अशी माहिती वनपाल गाडेकर यांनी दिली. तसेच हा बिबट्या जालना जिल्ह्यातून नदी काठ पारकरून शेतात आल्याचा अंदाज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here